• Home
  • ताज्या बातम्या
  • जादूटोण्याचा धाक दाखवत भोंदूबाबाने केला महिलेवर १४ वर्ष लैंगिक अत्याचार
Top News

जादूटोण्याचा धाक दाखवत भोंदूबाबाने केला महिलेवर १४ वर्ष लैंगिक अत्याचार

website 77

Sexual assault on a woman : आज ए‍कविसाव्या शतकात आणि तंत्रज्ञानाच्या युगात देखील अंधश्रद्धेला बळी पडणारी पिढी मोठ्या प्रमाणावर आहे. नाशकात अशाच एका भोंदूबाबाच्या बोलण्याला एक महिला बळी पडल्याचं समोर आलं आहे. तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव नाही तर, तुझ्या घरातील कुणाचा तरी बळी जाईल, अशी जादूटोण्याची भीती दाखवत हा भोंदूबाबा गेली वर्ष या महिलेवर लैंगिक अत्याचार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात एक खळबळ उडाली आहे.

लैंगिक अत्याचाराबरोबरच या भोंदूबाबाने महिलेला ५० लाखांचा गंडा लावल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर आता या प्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल झाल्यानं अजून काही महिला समोर येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याप्रकरणी नाशिकच्या निफाड तालुक्यातील धारणगाव येथील गणेश जगताप असे या भोंदू बाबाचे नाव आहे.

हेही वाचा – भायखळा परिसरात बांधकाम साईटवर काम करताना 5 कामगार जखमी, दोघांचा मृत्यू

माझ्यासोबत संबंध ठेवला नाहीस तर, एकाचा बळी जाईल..

तू मला आवडते तुला मिळवण्यासाठी मी स्मशानात पूजा करतो” असे सांगत महिलेवर दबाव आणल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. त्याच्याकडील पुस्तकात पतीसह मुलांची नावे लिहिली आहेत. जर माझ्यासोबत संबंध ठेवला नाही तर पुस्तकातील नावांपैकी एकाचा बळी जाईल, अशी जादूटोण्याची भीती दाखवत 2010 पासून आतापर्यंत अनेक वेळा या भोंदूबाबाने पीडितेवर लैंगिक अत्याचार केल्याचं सांगण्यात आलं आहे.

ट्रॉसिटीसह विविध कलमाद्वारे गुन्हा दाखल

जादूटोण्याची भीती दाखवत हा भोंदूबाबा महिलेवर गेल्या 14 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता. लैंगिक अत्याचारासह 50 लाखांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात संशयित भोंदू बाबा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ॲट्रॉसिटीसह विविध कलमाद्वारे करण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

भोंदूबाबा फरार

या प्रकरणी पोलि‍सांमध्ये गुन्हा दाखल झाल्याची कुणकुण लागताच, या भोंदूबाबने राहत्या ठिकाणाहून पळ काढला आहे. पोलिसांत गुन्हा दाखल होत नाही तोच आरोपीला त्याची कशी माहिती होते, असा प्रश्न आता पोलिसाना पडला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखीन काही जण सहभागी असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आता भोंदूबाबा फरार असून पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी रवाना झाले आहे. त्याला लवकर अटक करण्याची मागणी तक्रारदार महिलेकडून करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts