• Home
  • महाराष्ट्र
  • रोहा तालुक्यात घरफोडी आणि दुचाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
गुन्हा

रोहा तालुक्यात घरफोडी आणि दुचाकी चोरी; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Crime text with handcuffs placed on the side symbolizing burglary and vehicle theft

burglary and bike theft in Roha : सध्या थंडीचा जोर वाढत असल्याने नागरिक घराबाहेर जास्त पडत नाही. परंतु याचाच फायदा आता चोरटयांनी घेतल्याचे दिसत आहे. रोहा तालुक्यात चोरटयांनी मध्यरात्रीचा थंडीचा फायदा उचलत घरफोडी आणि दुचाकी चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहे.

काय हे संपूर्ण  प्रकरण

रोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज नगर येथे मध्यरात्रीच्या सुमारास हि घटना घडली. चोरटयांनी घरफोडी करून रोकड दागिने लंपास केले. याशिवाय पाले बुद्रुक येथील रहिवासी असलेले पांडुरंग महाबळे यांच्या घरासमोर उभी असलेली दुचाकीही चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बंद घरातून चोरीचे प्रकार वाढू लागल्याची स्थानिकांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हे ही वाचा : पाण्याच्या टबमधून क्लू मिळाला अन् रक्तरंजित खेळ जगासमोर आला, ४ चिमुरड्याचा घेतला जीव

१४,३०० रुपयांची मालमत्ता चोरीला (burglary and bike theft in Roha)

मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी आंबेवाडीतील छत्रपती शिवाजी महाराज नगरमधील सुरेश गजानन कदम यांच्या घराचा दरवाजा लोखंडी साधनाने उचकावून घरफोडी केली. या चोरीमध्ये त्यांनी ४,३०० रुपये किमतीचे चांदीचे दागिने, मनगटी घड्याळ आणि १०,००० रुपये रोख अशी एकूण १४,३०० रुपयांची मालमत्ता चोरीस गेली. आणि दुचाकी देखील चोरतींनी लांपास केली आहे.

कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.फौजदार नागे हे या संपूर्ण घटनेचा तपास करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts