Breaking News :
क्रीडा

रियान परागवर IPL ची मोठी कारवाई; दंड ठोठावत दिला कडक इशारा

रियान परागवर IPL ची मोठी कारवाई; दंड ठोठावत दिला कडक इशारा

Action on Riyan Parag : अखेर रियान परागवर कारवाई करण्यात आली आहे. अलीकडेच, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट ओढताना आढळला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यामुळं सर्वत्र खळबळ उडाली होती. यानंतर, त्याच्यावर कारवाई केली जाईल असं मानलं जात होतं. आता, आयपीएलनं त्याच्या विरोधात कठोर भूमिका घेतली असून शिक्षेची घोषणा केली आहे.

हेही वाचा : रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ ब्लॉकबस्टर आधीच? रिलीजपूर्वीच 193 कोटींचा बिझनेस

काय केली कारवाई :

आयपीएलच्या 40 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्स एकमेकांसमोर आले होते. या सामन्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यात रियान पराग ई-सिगारेट ओढताना दिसत होता. आयपीएलनं सांगितलं की, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान परागला त्याच्या सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. खेळाडू आणि संघ अधिकाऱ्यांसाठी असलेल्या आयपीएलच्या आचारसंहितेच्या स्तर 1 चं उल्लंघन केल्याबद्दल त्याला एक डिमेरिट पॉइंटही मिळाला आहे. रियान आयपीएलच्या आचारसंहितेच्या कलम 2.21 चं उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला, जे खेळाची बदनामी करणाऱ्या वर्तनाशी संबंधित आहे. ही घटना दुसऱ्या डावादरम्यान घडली, जेव्हा रियान ड्रेसिंग रुममध्ये ई-सिगारेट वापरताना दिसला.

राजस्थान गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर :

दरम्यान, राजस्थान रॉयल्स या आयपीएल हंगामात चांगली कामगिरी करत आहे. त्यांनी आतापर्यंत खेळलेल्या नऊ सामन्यांपैकी सहा जिंकले असून तीन गमावले आहेत. यामुळं त्यांचे एकूण 12 गुण झाले असून ते गुणताविकेत सध्या चौथ्या क्रमांकावर आहे. ज्या सामन्यात रियान परागची ही घटना घडली, त्या सामन्यात राजस्थाननं पंजाब किंग्सला सहा गडी राखून पराभूत केलं होतं. हा संघ आता शुक्रवार, 1 मे रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध आपला पुढचा सामना खेळेल.

भारतात ई-सिगारेटवर बंदी :

विशेष म्हणजे स्टेडियम आणि ड्रेसिंग रुममध्ये धूम्रपान करण्यास सक्त मनाई आहे. मात्र परागच्या हातात ई-सिगारेट किंवा व्हेप असण्याच्या कथित घटनेमुळं आणखी गंभीर प्रश्न निर्माण होतात. याशिवाय इलेक्ट्रॉनिक सिगारेट प्रतिबंधक कायदा (PECA), 2019 अंतर्गत भारतात ई-सिगारेट/व्हेप्सचं उत्पादन, विक्री, खरेदी, आयात, निर्यात आणि जाहिरात यावर पूर्णपणे बंदी आहे. या कायद्याचं उल्लंघन केल्यास तुरुंगवास आणि मोठ्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts