• Home
  • महाराष्ट्र
  • खेड तालुक्यातील कारखान्यामुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
गुन्हा

खेड तालुक्यातील कारखान्यामुळे संपूर्ण परिसर धुराच्या विळख्यात; नागरिकांचा आंदोलनाचा इशारा

Illegal factory pollution creating health hazard in Khed taluka

Khed taluka factory pollution : खेड तालुक्यातील जैदवाडी हायवे लगत असलेल्या एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या काळ्या धुरामुळे संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याची माहिती समोर आली आहे.

पुणे जिल्ह्यातील श्रद्धास्थान असलेल्या सौरंग्या दत्तमंदिर परिसरात नागरिकांचे जनजीवन अक्षरशः धुरात हरवलं. खेड तालुक्यातील जैदवाडी हायवे लगत असलेल्या एका कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर निघणाऱ्या काळ्या धुरामुळे संपूर्ण परिसर प्रदूषणाच्या विळख्यात सापडला आहे.

हे ही वाचा : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक; 14 नक्षलवाद्यांचा खात्मा

आंदोलन छेडलं जाणार असल्याचा इशारा

सकाळी आणि संध्याकाळी हवेत पसरणाऱ्या या दाट धुरामुळे नागरिकांना श्वास घेणं अवघड झालं असून डोळ्यांची जळजळ, घसा खवखवणे, आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. ग्रामस्थांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. स्थानिक ग्रामस्थांचा आरोप आहे की हा कारखाना ॲग्रीकल्चर झोनमध्ये अवैधरित्या सुरु असून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केलं आहे. आता ग्रामस्थांकडून या कारखान्यावर तातडीने कारवाई न केल्यास मोठं आंदोलन छेडलं जाणार असल्याचा इशारा प्रशासनाला देण्यात आला आहे.

स्थानिक नागरिकांचे आरोग्य अडचणीत

या परिसरात शाळा, हॉटेल व्यवसाय आणि बटाट्याचं पीक मोठ्या प्रमाणात असून, या धुरामुळे सगळ्यांचं जीवन विस्कळीत झालं आहे. वन्यजीव, शेतकरी आणि स्थानिक नागरिक यांच्यावर या प्रदूषणाचा मोठा परिणाम झाल्याचंही स्पष्ट होतंय. आता ग्रामस्थांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला असून आंदोलन छेडणार असल्याचे संकेत दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts