• Home
  • राजकारण
  • ठाकरे बंधुंची दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत प्रदर्शित केली जाणार
Top News

ठाकरे बंधुंची दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत प्रदर्शित केली जाणार

Joint interview of the Thackeray brothers

Thackeray brothers joint interview : सध्या राज्यातील २९ महापालिकांसाठी रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची संयुक्त मुलाखत प्रदर्शित केली जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलीय. दोन्ही ठाकरे बंधुंची मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – ‘लोकशाहीच्या नावाने ही झुंडशाही चालू;’ अर्ज माघारीवरून राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबईत महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर राजकीय वर्तुळात मोठी उलथापालथ पाहायला मिळतेय. यंदाच्या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी ठरलेली गोष्ट म्हणजे, ठाकरे बंधूंचं मनोमिलन. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती झाली असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र निवडणूक लढवणार आहेत. दोघांनी जागावाटप आटोपला असून आपापले हुकमी एक्के निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. ठाकरे बंधूंची युती मुंबई आणि महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी घडामोड ठरलीय. अशातच आता जोरदार प्रचार सुरू होणार आहेत. त्यापूर्वी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत घेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाईल

‘राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची संयुक्त मुलाखत सामनातून प्रदर्शित केली जाईल. ठाकरे बंधूंची एकत्रित ही पहिलीच मुलाखत असणार आहे,’ संजय राऊत म्हणाले.

ठाकरे बंधु एकत्र येण्यात महेश मांजरेकरांचे योगदान

राज ठाकरे यांनी बोलताना ज्या मुलाखतीचा उल्लेख केला ती मुलाखती अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी घेतली होती. महेश मांजरेकर यांनी काही महिन्यांआधीच त्यांचं युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. Wacko Sanity या त्यांच्या युट्यूब चॅनलवर त्यांनी राज ठाकरे यांची मुलाखत घेतली होती. या मुलाखीत बोलताना राज ठाकरेंनी “कोणत्याही वादापेक्षा आणि भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे”, हे वक्तव्य केलं होतं. युतीची घोषणा झाल्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत संवाद साधला. त्यावेळी राज ठाकरेंनी या वाक्याची आठवण करुन दिली आणि म्हणाले की, “मला असं वाटतं की आज आम्ही एकत्र येण्याची सुरुवात त्या वाक्यापासून झाली…”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts