Maharashtra Bike Taxi Ban : महाराष्ट्रात बाईक टॅक्सीचा मुद्दा गेल्या काही वर्षांपासून वादग्रस्त ठरला आहे. अलीकडेच राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर पोलिसांना अवैध बाईकटॅक्सी यांच्यावर बंदी आणण्याबाबत पत्र लिहिले आहे. याविरोधात बाईकटॅक्सी अससोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामुळे बाईकटॅक्सी चालकांचा रोजगारावर गदा येईल असा मुद्दा उपस्थित केला आहे.
सुरक्षेचा गंभीर मुद्दा
राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सायबर पोलिसांना लिहिलेल्या सुरक्षेचा मुद्दा मांडला आहे. पत्रात विशेषतः Rapido, OLA, उबेर सारख्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांमुळे सार्वजनिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. चालकांची योग्य पडताळणी, विमा संरक्षण, महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा आणि आपत्कालीन प्रतिसाद प्रणालींचा अभाव असल्याचा आरोपही करण्यात आला. मागील फेब्रुवारीत मुंबई लिंक रोड परिसरात एका अनधिकृत बाईक टॅक्सीचा अपघात होऊन महिलेचा मृत्यू झाल्याचा संदर्भ देत, या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आल्याचेही पत्रात नमूद आहे. तसेच या अँप्सवर सुद्धा बंदी आणण्याची मागणी केली.
रोजगारावर गदा
याच्याविरोधात बाईकटॅक्सी अससोसिएशने थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून यामुळे बाईकटॅक्सी चालकांचा रोजगारावर गदा येईल असा मुद्दा उपस्थित केला आहे. या संदर्भात एका बाईकटॅक्सी चालकाने सोशाल मीडियावर एक विडिओ टाकला आहे. हा विडिओ सोसशल मीडियावर प्रचंड विरळ होत आहे. यात तरुणाने बाईक टॅक्सी चालकांची बाजू बाईकटॅक्सी अससोसिएशन च्या द्वारे मंडळी आहे. यात तरुण असे म्हणतो कि “बाईक टॅक्सी हि फक्त एक राईड नसून हजारो तरुणांचा रोजगार आहे”. यामुळे अनेक तरुण बेरोजगार होतील असा मुद्दा मांडला आहे.
आता हा वाद सोशल मीडियावर चांगलाच चिघळलेला दिसत आहे. मुख्यमंत्री यावर आता काय भूमिका घेतील याकडे सार्वांचे लक्ष लागले आहे.












