Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • सराफ बाजारात मोठी उलथापालथ, सोनं 1,748 रूपयांनी घसरलं, तर चांदी 8,350 रूपयांनी आपटली
Top News

सराफ बाजारात मोठी उलथापालथ, सोनं 1,748 रूपयांनी घसरलं, तर चांदी 8,350 रूपयांनी आपटली

Jewelry Market

Jewelry Market : इराण सोबत इस्त्रायल-अमेरिकेचं युद्ध पेटलं आणि जीवनावश्यक वस्तूंनी भाव खायला सुरूवात केली. त्यातलं सर्वांत मोठी उदाहरणं म्हणजे गॅस! सिलिंडरच्या दरात वाढ झाली, त्यामुळं गॅस पुरवठा विस्कळीत होऊ लागला. परिणामी, हॉटेल, खानावळी बंद पडू लागल्या मात्र गरिबांच्या आवाक्यात न येणारं आणि नेहमी भाव खाणारं सोनं मात्र दिवसेंदिवस घसरू लागलं. इतकंच नव्हे, तर सोन्यासोबत चांदीच्या दरातही घसरण होऊ लागलीये. आज सोनं 1,748 रूपयांनी घसरलं, तर चांदी 8,350 रूपयांनी आपटल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा – 8th Pay Commission: बेसिक पगारापासून ते थकबाकीपर्यंत… आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीनंतर तुमच्या खात्यात किती आणि कधी येणार पैसे?

24 कॅरेट सोन्याचा दर

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत रोजचं काही प्रमाणात घट झाल्याचं पाहायला मिळालं. 24 कॅरेट सोन्याचा दर आज 1,58,555 रूपये प्रति 10 ग्रॅमवर आलाय. जो काल संध्याकाळपर्यंत हाच दर 1,60,303 रूपये प्रति 10 ग्रॅम होता. आतापर्यंत सोन्याच्या किमतीत 1,748 रूपयांची घसरण झालीये. विशेष म्हणजे काल दुपारपर्यंत 24 कॅरेट सोन्याचा 1,59,624 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

आता जरा चांदीच्या दरावर नजर टाकू…

चांदीचा दर आज 2,59,951 रुपये प्रति किलोपर्यंत खाली आलाय. काल संध्याकाळपर्यंत एक किलो, चांदीचा दर 2,68,301 रूपये होता. आज चांदीच्या किमतीत 8,350 रूपयांची घट झाली आहे. काल सकाळपर्यंत याच चांदीचा दर 2, 63, 800 रुपये प्रति किलो इतका होता.

सोन्याच्या किमती घसरणीमागं डॉलर हे मुख्य कारण मानलं जातंय

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सोनं का स्वस्त होतंय? त्याचे कारण आहे सोन्याच्या किमतीतील घसरणीमागं डॉलर हे मुख्य कारण मानलं जातंय. आजच्या जागतिक अनिश्चिततेच्या काळात डॉलर मजबूत होत असून त्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळं सोन्याचे भाव आज पुन्हा घसरले आहेत. शिवाय, लग्नसराईचा हंगाम संपल्यानं देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किमतीत झालेली घट यातून स्पष्टपणे दिसून येतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts