Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • मालाडमध्ये ‘रिधम बाबा’वर कारवाई; जादूटोण्याच्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रकार उघड
Mumbai

मालाडमध्ये ‘रिधम बाबा’वर कारवाई; जादूटोण्याच्या नावाखाली अंधश्रद्धेचा प्रकार उघड

Malad Bhondu Baba News
91

Malad Bhondu Baba News: मुंबईतील मालाड परिसरात भोंदूगिरी आणि जादूटोण्याच्या नावाखाली लोकांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला असून ‘रिधम बाबा’ला दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे.

मालाड परिसरात स्वतःला देवीचा अवतार सांगून लोकांवर उपचार करण्याच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. रिधम पांचाल उर्फ मॉन्टी पांचाल (वय ३७) असे या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा: विधान परिषदेच्या १७ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार; A टू Z माहिती जाणून घ्या

आरोपीवर आरोप आहे की तो “देवी अंगात येते” असा दावा करून गुरुवार आणि रविवार या दिवशी दरबार भरवत असे. या दरम्यान तो लोकांकडून पैसे, कोंबडी, बकऱ्याचे काळीज, दारू आणि सिगारेट यांसारख्या वस्तू मागत असल्याचे समोर आले आहे.

दिंडोशी पोलिसांनी कारवाई करत त्याला अटक केली असून त्याच्याविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मध्यरात्रीपर्यंत सुरू असायचा, जिथे पुरुष, महिला आणि तरुणी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत.

आरोपी जिम ट्रेनर होता आणि नंतर त्याने भविष्य सांगणे व जादूटोणा करण्यास सुरुवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. तो लोकांच्या समस्या सोडवण्याचे आणि निपुत्रिक महिलांना मूल होण्याचे दावेही करत असल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांच्या तपासात त्याचे काही राजकीय संपर्क असल्याचीही चर्चा आहे. सध्या या प्रकरणात ६० हून अधिक तक्रारदार पुढे आले असून पुढील तपास सुरू आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts