• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • TCS कंपनीतील आरोपींचे दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांसोबत कनेक्शन? नवे धागेदोरे समोर
Top News

TCS कंपनीतील आरोपींचे दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांसोबत कनेक्शन? नवे धागेदोरे समोर

nashik it

Nashik IT Company Case | नाशिकमधील आयटी कंपनी टीसीएसमध्ये (Nashik IT TCS Company) एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचे धर्मांतर आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण नाशिक (Nashik) जिल्हा हादरला आहे. तर आता या प्रकरणातून आणखी नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. टीसीएस कंपनीतील आरोपींचं दिल्ली स्फोट (Delhi Blast) प्रकरणातील आरोपींसोबत कनेक्शन असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा – HR निदाचा धडकी भरवणारा प्लान; बुरखा घालायला लावलं अन्…, नाशिकच्या TCS कंपनीतील कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा

निदा खान दहशतवाद्यांच्या संपर्कात?

या प्रकरणातील संबंधित कंपनीची एचआर मॅनेजर निदा खान (Nida Khan) हीचा कंपनीत मोठा दबदबा होता. तिला सर्व कर्मचारी ‘दबंग मॅम’ म्हणत होते. तसेच कंपनीत तिचा दरारा इतका जास्त होता की प्रत्येकजण तिला घाबरत होतं, अशी माहिती देत पीडित कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात निदा खानविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर अनेक आरोप केले आहेत. तसेच निदा खान ही सध्या फरार असून ती दहशतवाद्यांच्या संपर्कात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.

निदा खानचे दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टर शहीनशी कनेक्शन?

समोर आलेल्या माहितीनुसार, निदा खान ही फरार असून सध्या ती भिवंडीत लपून बसल्याची माहिती मिळत आहे. तसेच निदा खानचे दिल्ली स्फोट प्रकरणातील डॉक्टर शहीनशी कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. निदा खानच्या या कनेक्शनमुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने पोलिसांनी तपास मोठ्या वेगाने करण्यास सुरूवात केली आहे. पोलिसांनी निदा खानचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत. तर आता या प्रकरणातून आणखी धक्कादायक खुलासे होणार असल्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

निदा खान ही फक्त एचआर म्हणून कंपनीत काम करत नव्हती तर ती महिला कर्मचाऱ्यांचा मोठा छळ करत होती. ती कंपनीच्या टीम लीडर्ससोबत मिळून महिला कर्मचाऱ्यांचा छळ करायची आणि त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होती. ती महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी धर्माचं पालन कसं करायचं, कपडे कसे घालायचे, बुरखा कसा घालायचा या गोष्टी शिकवत होती आणि त्यांना ते जबरदस्तीने करायला भाग पाडत होती, असा दावा पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. संबंधित कंपनीतील आरोपींनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपची सदस्य एचआर निदा खान ही देखील होती. तर या ग्रुपद्वारे कंपनीतील कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जायचं आणि त्यांचं धर्मांतर केलं जात होतं, अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts