Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • HR निदाचा धडकी भरवणारा प्लान; बुरखा घालायला लावलं अन्…, नाशिकच्या TCS कंपनीतील कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा
Top News

HR निदाचा धडकी भरवणारा प्लान; बुरखा घालायला लावलं अन्…, नाशिकच्या TCS कंपनीतील कर्मचाऱ्यांचा मोठा खुलासा

Nashik IT Company | एकिकडे नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडले आहे. अशातच आता नाशिकमधून आणखी एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. नाशिकमधील एका टीसीएस कंपनीत (Nashik TCS Company) कर्मचाऱ्यांचे धर्मांतर आणि लैंगिक छळ केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली असून आरोपींना अटक केली आहे. तसेच आता या प्रकरणातील पीडित कर्मचाऱ्यांनी पुढे येत पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून मोठा खुलासा केला आहे.

हेही वाचा –  “त्या इमारतीत आत्मे आहेत, जर तुम्हाला मुक्ती हवी असेल तर…”, संजय शिरसाटांचा विचित्र दावा, राजकीय वर्तुळात खळबळ

HR निदाबाबात पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

या प्रकरणातील संबंधित कंपनीची एचआर मॅनेजर निदा खानबाबत पीडित कर्मचाऱ्यांनी मोठा खुलासा केला आहे. एचआर निदा खान हीचा कंपनीत मोठा दबदबा होता. तिला सर्व कर्मचारी ‘दबंग मॅम’ म्हणत होते. तसेच कंपनीत तिचा दरारा इतका जास्त होता की प्रत्येकजण तिला घाबरत होतं, अशी माहिती देत पीडित कर्मचाऱ्यांनी पोलीस स्थानकात निदा खानविरोधात तक्रार दाखल केली असून तिच्यावर अनेक आरोप केले आहेत.

पीडित कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, निदा खान ही फक्त एचआर म्हणून कंपनीत काम करत नव्हती तर ती महिला कर्मचाऱ्यांचा मोठा छळ करत होती. ती कंपनीच्या टीम लीडर्ससोबत मिळून महिला कर्मचाऱ्यांचा छळ करायची आणि त्यांना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडत होती. ती महिला कर्मचाऱ्यांना इस्लामी धर्माचं पालन कसं करायचं, कपडे कसे घालायचे, बुरखा कसा घालायचा या गोष्टी शिकवत होती आणि त्यांना ते जबरदस्तीने करायला भाग पाडत होती, असा दावा पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे.

पीडित महिला कर्मचाऱ्यांनी सांगितला घडलेला सर्व प्रकार

एका गटाने महिला कर्मचाऱ्यांना लक्ष्य करत त्यांच्यावर धार्मिक दबाव आणला होता आणि त्यांचे लैंगिक शोषण केले होते. या गटात सात पुरूष एका टोळीप्रमाणे काम करत होते. ते कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी आपल्या पदांचा वापर करत होते. तसेच ते महिला कर्मचाऱ्यांकडे एकटक बघायचे, त्यांना कुठेही स्पर्श करायचे, असे आरोपही पीडित महिला कर्मचाऱ्यांनी केले आहेत. या गुन्हांमध्ये एचआर निदा खानचाही समावेश होता, असा आरोपही करण्यात आला आहे.

या प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक माहिती देखील समोर आली आहे. संबंधित कंपनीतील आरोपींनी एक व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. या ग्रुपची सदस्य एचआर निदा खान ही देखील होती. तर या ग्रुपद्वारे कंपनीतील कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं जायचं आणि त्यांचं धर्मांतर केलं जात होतं, अशी माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एक महिला अधिकाऱ्याने “अशा गोष्टी घडतात” असं सागून एका पीडितेला तक्रार दाखल करण्यापासून परावृत्त केलं होतं, अशी माहिती देखील समोर आली आहे.

या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत एक महिला आणि सात पुरूष आरोपींना अटक केली आहे. तसेच सध्या या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली निदा खान ही अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. यासाठी पोलिसांनी आपली पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केली आहेत. तसेच या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी एसआयटी देखील स्थापन केली आहे.

 

 

 

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts