• Home
  • महाराष्ट्र
  • रूद्राक्षाच्या माळांची भिती दाखवत तरूणीचे लैंगिक शोषण, नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचं अश्लील कांड समोर
Top News

रूद्राक्षाच्या माळांची भिती दाखवत तरूणीचे लैंगिक शोषण, नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचं अश्लील कांड समोर

nashik crime

Nashik Crime | नाशिकमध्ये (Nashik) अशोक खरात प्रकरणाने (Ashok Kharat Case) एकच खळबळ उडवून सोडली आहे. भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांच्या विश्वासाचा फायदा घेत त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एकिकडे अशोक खरातचे हे प्रकरण ताजे असतानाच आता नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाचे अश्लील कांड उघडकीस आले आहेत.

हेही वाचा – “सुनेत्रा पवार जर मुख्यमंत्री झाल्या तर आम्हाला…”, बारामतीत मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळेंचं मोठं वक्तव्य

नाशिकमध्ये आणखी एका भोंदूबाबाने केले तरूणीचे लैंगिक शोषण

निफाड तालुक्यातील प्रति गाणगापूर येथील धारणगाव खडकमधील एका मठातील महेश गिरी या भोंदूबाबाचे काळे कारनामे समोर आले आहेत. महेश गिरी या भोंदूबाबावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहेत. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्थानकात महेश गिरीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोंदूबाबाने तरूणीला कसं अडकवलं जाळ्यात?

मिळालेल्या माहितीनुसार, एका तरूणीचे लग्न जमविण्यात अनेक अडथळे येत होते. त्यामुळे या तरूणीच्या आई-वडीलांनी तिला भोंदू महेश गिरी बाबाकडे नेले होते. तिथे तिला भोंदूबाबाने बाहेरची बाधा झाल्याचं सांगत तिचे पाप धुण्यासाठी तिला पापनाशक कुंडात आंघोळ घालण्याचा सल्ला दिला. नंतर तिला त्या पापनाशक कुंडात आंघोळ घालण्यात आली आणि नंतर उंबराच्या झाडाला ओल्या कपड्यांमध्ये सात फेऱ्या मारायला सांगितल्या. त्यानंतर हा भोंदूबाबा एवढ्यावर थांबला नाही तर त्याने तरूणीला व्हॉटसअॅपवर मेसेज देखील केले होते.

या भोंदूबाबाने तरूणीला अश्लील मेसेज टाकण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर तरूणीला दैवी विधी मार्गदर्शन करण्यासाठी तिला एकटीला न्यावं लागेल असं सांगून भोंदूबाबाने तिला त्र्यंबकेश्वर रोडवरील एका लॉजमध्ये नेलं. तिथे गेल्यानंतर भोंदूबाबाने तरूणीला रूद्राक्षाच्या माळांची भीती दाखवत तिचे लैंगिक शोषण केले. तरूणीवर अत्याचार केल्यानंतर भोंदूबाबाने तिला नाशिकला सोडून तो पुण्यात असलेल्या मठाकडे निघून गेला असल्याचा आरोप पीडित तरूणीच्या आई-वडीलांनी केला आहे.

पीडितेच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी भोंदूबाबा महेश गिरीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच सध्या पोलीस आरोपीचा शोध घेत असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts