गुन्हा

मनीषा प्रकरण तापलं; पोलिसांवर कारवाई, तरीही आरोपी गायब!

Manisha case controversy
158

हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील सिंघाणी गावात शिक्षिका मनीषा हिचा मृतदेह १३ ऑगस्ट रोजी शेतात आढळला. सुरुवातीला गळा चिरल्याचा संशय व्यक्त झाला, मात्र दोन शवविच्छेदनांनंतर तिच्या शरीरात कीटकनाशक आढळले असून जखमा मृत्यूनंतर प्राण्यांमुळे झाल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं होतं. आत्महत्येची चिठ्ठीही सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. तरीही कुटुंबीयांनी पोलिसांवर निष्काळजीपणा व प्रकरण दडपण्याचा आरोप केला आहे. आंदोलन भडकले असून मुख्यमंत्री यांनी भिवानी एसपी बदली व पाच पोलिस निलंबित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts