Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मागण्यांवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज १६ मे अंतरवाली सराटी येथे महत्वाची बैठक बोलावली असून पुढील आंदोलनाची दिशा याच बैठकीत ठरणार आहे.
या बैठकीसाठी राज्यातील विविध भागांतील मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. अनेक कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून अंतरवाली सराटीकडे रवाना झाले आहेत. सरकारकडून दिलेल्या आश्वासनांची अंमलबाजावणी न झाल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे.
हेही वाचा: Raja Shivajiचा दुसरा आठवडाही दमदार; बॉक्स ऑफिसवर गाजलं, पाहा आतापर्यंत किती झाली कमाई!
मागण्यांवर पुन्हा जोर
आंदोलकांच्या म्हणण्यानुसार कुणबी नोंदी (Kunbi certificate demand) असलेल्या मराठा समाजाला तात्काळ प्रमाणपत्र देणे, शिंदे समितीच्या नोंदींची अंमलबाजवणी करणे, तसेच आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे या प्रमुख मागण्या अजूनही प्रलंबित आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या आंदोलनाची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आंदोलनाची पुढील दिशा आज ठरणार
आज सकाळी होणाऱ्या बैठकीत आंदोलनाची तारीख आणि स्वरूप निश्चित होण्याची शक्यता आहे. उपोषण पुन्हा सुरू होणार का किंवा नवीन आंदोलनाची रूपरेषा ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












