• Home
  • महाराष्ट्र
  • मुळशी पॅटर्न 2 ला मुळशीकरांचा विरोध; “मुळशी” नाव नको, स्थानिकांचा इशारा तरडे पॅटर्न नाव ठेवा
Pune

मुळशी पॅटर्न 2 ला मुळशीकरांचा विरोध; “मुळशी” नाव नको, स्थानिकांचा इशारा तरडे पॅटर्न नाव ठेवा

Mulshi Pattern 2
55

Mulshi Pattern 2 : मुळशी पॅटर्न नाव घेतलं की डोळ्यासमोर येते गुन्हेगारी, गुंडगिरी आणि लँडमाफियाची प्रतिमा…पुण्यासह राज्यात कुठे ही गुन्हेगारीही घटना घडली की मुळशी पॅटर्न हे नाव घेतलं जात…पण ज्या मुळशीच्या नावावर हा सिनेमा गाजला होता त्याच मुळशीकरांनी आता ‘मुळशी पॅटर्न 2’ ( Mulshi Pattern 2 ) च्या नावालाच विरोध केला आहे…दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्या आगामी ‘मुळशी पॅटर्न 2’वरून मुळशी तालुक्यात संतापाचं वातावरण आहे…आधीच्या मुळशी पॅटर्न चित्रपटामुळं आधीच बदनामी झाली असून शिक्षण घेतलेल्या मुलानं अडचणी येत आहेत नोकरी लागत नाहीये…महत्वाच म्हणजे सिनेमाच्या कथेला विरोध नाही, मात्र मुळशी हे नाव वापरू नका अशी स्पष्ट भूमिका स्थानिकांनी घेतली आहे…आधीची चूक लक्षात आली त्यामुळे आता पुन्हा चूक करायची नाही…

‘मुळशी पॅटर्न’मुळे बदनामी झाल्याचा मुळशीकरांचा आरोप ( Mulshi Pattern 2 )

मुळशी पॅटर्न चित्रपटामुळे आधीच मुळशी गाव बदनाम आहे…इथं स्थानिक मुलांना नोकऱ्या मिळत नाही एका वेगळा दृष्टिकोनातून पाहिलं जातं आहे…उद्योग या ठिकाणी येत नाहीयेत…मुळशी पत्ता पहिला की कुणी नोकरी देत नाहीय…आधीच्या मुळशी पॅटर्नमध्ये जमिनी विकायच्या नसतात राखायच्या असतात त्या नावाखाली खोटी स्क्रिप्ट खपवल्याचं स्थानिकांनी सांगितलं आहे.

मुळशीकरांच्या म्हणण्यानुसार पहिल्या मुळशी पॅटर्नमुळे तालुक्याचं नाव बदनाम झालं…त्याचबरोबर मुळशीची ओळख गुन्हेगारीशी जोडली गेली. आता दुसऱ्या भागामुळे हीच प्रतिमा पुन्हा निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे…यासाठी स्थानिकांनी ‘मुळशी बचाव समिती’ स्थापन केली असून, गावागावातून ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे…मुळशी पॅटर्न दोनमध्ये वाळूच्या भिंतीची गोष्ट असे सांगण्यात आले, पण मुळशीमध्ये कुठे वाळू आहे ते सांगाव…यामुळे मुळशीच नाव अजून बदनाम होत आहे…त्यामुळे आमचा कडाडून विरोध असणार आहे…आम्ही आमचा पॅटर्न दाखवून देऊ असा इशारा दिलाय..

हेही वाचा : पुणेकरांचा DJ ला विरोध गणेशोत्सावात कशाला बंदी कशाला परवानगी?

स्थानिक युवकांच्या नोकरीवर परिणाम झाल्याचा दावा ( Mulshi Pattern 2 )

मुळशीकरांनी हा मुद्दा उद्योग, रोजगार, स्थानिक युवक-युवतींचे विवाह आणि तालुक्याची सामाजिक प्रतिमा यांच्याशी जोडला आहे.मुळशी पॅटर्न चित्रपटांनंतर मुळशी तालुक्यात कुठेही सोयरीक जुळत नाही, मुलांना स्थळ मिळत नसल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली…तर याच मुळशी तालुक्यातील वांद्रे गावातील एका तरुणाला बाहेर नोकरीसाठी गेल्यावर आधारकार्डवर त्याचा पत्ता मुळशी तालुका असल्याने त्याला नोकरी मिळाली दिली नाही, हे वास्तव आज तरुण सांगत आहेत…

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी मे 2026 मध्ये ‘मुळशी पॅटर्न 2 – तुमच्या घराच्या भिंतीतल्या वाळूची गोष्ट’ अशी घोषणा केलीय…त्यांच्या म्हणण्यानुसार, घर बांधण्याचा खर्च एवढा महाग का झाला, यामागचा प्रश्न या चित्रपटातून मांडला जाणार आहे. LS मराठीने प्रवीण तरडे यांच्याशी संपर्क करुन यावर तुमची भूमिका काय असे विचारल्यावर तरडे यांनी काही माहिती नाही असे म्हटले आणि बोलणे टाळले…

ज्या मुळशीच्या नावाभोवती मुळशी पॅटर्नची कथा फिरली त्याच मुळशीमध्ये आता या नावाविरोधात आवाज उठतोय…पहिल्या चित्रपटांनंतर मुळशीची ओळख गुन्हेगारी आणि लँडमाफियाशी जोडली आता ‘मुळशी पॅटर्न 2’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मुळशीचं नाव चर्चेत येणार असल्याने मुळशीकर सावध झालेत. त्यांचा विरोध सिनेमाला नाही, तर मुळशी या नावाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts