• Home
  • राजकारण
  • नांदूर ग्रामपंचायत निवडणुकीत उलथापालथ; रूपाली चाकणकर यांच्या भावाचा पराभव
ताज्या बातम्या

नांदूर ग्रामपंचायत निवडणुकीत उलथापालथ; रूपाली चाकणकर यांच्या भावाचा पराभव

rupali chankankar 1

Nandur Gram Panchayat Election: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर ग्रामपंचायत निवडणूकीत अनपेक्षित निकाल लागला असून, सरपंचपदाच्या लढतीत संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे. या निकालामुळे स्थानिक राजकारणात चर्चाना उधाण आले आहे.

पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील नांदूर येथे झालेल्या ग्रामपंचायत निवणुकीत सरपंचपदासाठी झालेल्या लढतीत महत्वाच्या राजकीय निकाल समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) च्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या कुटूंबाशी संबंधित उमेदवार संतोष बोराटे यांचा पराभव झाला आहे.

हेही वाचा: मस्साजोग पोटनिवडणूक निकाल जाहीर; स्वरूपानंद देशमुख विजयी, अश्विनी देशमुखांचा 92 मतांनी पराभव

या निवडणुकीत संतोष बोराटे यांच्याविरुद्ध उभे राहिलेल्या विशाल थोरात यांनी आघाडी घेत निर्णायक विजय मिळवला. मतमोजणीनंतर थोरात यांनी सुमारे ३०० पेक्षा अधिक मतांनी विजय मिळवत सरपंचपद पटकावले.

नांदूर ग्रामपंचायतीची ही निवडणूक स्थानिक स्तरावर अत्यंत प्रतिष्ठेची मानली जात होती. विविध गटांमधील चुरस आणि राजकीय समीकरणांमुळे ही लढत विशेष चर्चेत होती. निकालानंतर गावातील आणि तालुक्यातील राजकीय वातावरणात हालचाल वाढली आहे.

राजकीय विश्लेषकांच्या मते, या निकालामागे स्थानिक पातळीवरील गटबाजी, मतदारसंघातील बदललेले समीकरण आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नियोजन या घटकांचा प्रभाव दिसून येतो.

दरम्यान, या निकालाचा परिणाम आगामी स्थानिक तसेच मोठ्या निवडणुकांवर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नांदूरमधील या निकालामुळे दौंड तालुक्यातील राजकीय समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts