ताज्या बातम्या

श्रावण संपताच मांसाहारी पदार्थांच्या दुकानांवर तुंबळ गर्दी

Non veg shops crowded after Shravan ends

श्रावण महिना संपल्याने आज रविवारी मासे, चिकन व मटणाच्या दुकानांवर नागरिकांची मोठी गर्दी झाली. शनिवारी अनेकांनी मांसाहार टाळला होता, मात्र सुट्टीचा दिवस असल्याने आज सकाळपासूनच दुकाने गजबजली. मंगळवारी हरतालिका व बुधवारी गणेशोत्सव सुरू होत असल्याने पुढील काही दिवस पुन्हा मांसाहार टाळला जाणार आहे. दरम्यान चिकनचे भाव कमी झाले असून मटणाचे दर स्थिरच आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts