Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • Pandharpur News: 6 वर्षांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत गोंधळ; चुकीच्या हाताचे बोट काढल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?
Top News

Pandharpur News: 6 वर्षांच्या मुलाच्या शस्त्रक्रियेत गोंधळ; चुकीच्या हाताचे बोट काढल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

pandharpur

Pandharpur surgery error case: पंढरपुरातील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. नेमका काय प्रकार आहे. चला तर जाणून घेऊयात

पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. सहा वर्षाच्या मुलाच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांकडून चुकीच्या हाताचे बोट काढण्यात आल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

हेही वाचा:  एप्रिल-मे 2026 मध्ये लग्नासाठी किती शुभ मुहूर्त? पाहा संपूर्ण यादी

मिळालेल्या माहितीनुसार, शाहू सुनील दंदाडे या सहा वर्षीय मुलाच्या दोन्ही हातांना सहा- सहा बोटे होती. त्यापैकी उजव्या हाताचे अतिरिक्त बोट दुखत असल्याने ते शस्त्रक्रियेद्वारे काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, शस्त्रक्रियेच्या वेळी डॉक्टरांनी उजव्या ऐवजी डाव्या हाताचे बोट काढल्याचा गंभीर आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती

या प्रकरणात डॉ. वर्षा काणे यांनी शस्त्रक्रिया केल्याचे सांगितले जात आहे. घटनेची दखल घेत रुग्णालय प्रशासनाने चौकशी समिती नेमली असून समितीचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक विजयकुमार सरडे यांनी दिली आहे.

दरम्यान, या घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. जर आरोप खरे ठरले, तर ही बाब अत्यंत गंभीर मानली जाईल.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts