• Home
  • ताज्या बातम्या
  • जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी करताना 39 शेतकऱ्यांना विषबाधा,तर एका शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू
ताज्या बातम्या

जिल्ह्यात कीटकनाशके फवारणी करताना 39 शेतकऱ्यांना विषबाधा,तर एका शेतकऱ्याचा सर्प दंशाने मृत्यू

Pesticide poisoning affects 39 farmers
150

यंदाच्या खरीप हंगामात पिकांवर फवारणी करताना आवश्‍यक ती काळजी न घेतल्याने 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना 1एप्रिल ते आज पर्यंत घडल्या आहेत. खरीप हंगामात कपाशी, तूर यांसह फळपिकांवर फवारणी करण्यात येत आहे. मात्र, फवारणी करताना योग्य काळजी न घेतल्याने मागील चार महिन्यात 39 शेतकऱ्यांना विषबाधा झाल्याच्या घटना बुलढाणा जिल्ह्यात विविध ठिकाणी घडल्या आहेत. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करून सुट्टी देण्यात आली आहे. लोणार तालुक्यातील एका शेतकऱ्याचा कीटकनाशके फवारणी करताना सर्प दंशाने मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts