• Home
  • राजकारण
  • हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन
Top News

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

PM Modi Tribute to Balasaheb Thackeray

PM Modi Tribute to Balasaheb Thackeray : आज हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती आहे. या जयंती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी अभिवादन करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. तसेच जयंती निमित्त माटुंगा याठिकाणी षण्मुखानंद सभागृह याठिकाणी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एका मंचावर उपस्थित राहणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिवादन

बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे मुंबईच्या रीगल सिनेमा समोरील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब केशव ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे आणि पक्षाचे इतर बडे नेते उपस्थित होते.

हे ही वाचाहिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 100 व्या जयंती निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांची काकांसाठी भावनिक पोस्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भावनिक पोस्ट

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देखील देखील सोशल मीडियावर पोस्ट करत काकांना अभिवादन केले आहे. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम तसूभर पण कमी झालं नाही, उलट ते अधिकच दृढ होत गेलं. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतो की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली, तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थसाठी कधीही नसेल. बाळासाहेबांचं मराठी भाषेवर, मराठी प्रांतावर आणि मराठी माणसावर असलेलं जाज्वल्य प्रेम पाहून जी हजारो लाखो लोकं त्यांच्यासोबत येत गेली त्यातला मी एक आहे. त्यामुळे ‘बाळासाहेब’ आणि ‘मराठी’ या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा , प्रेम तसूभर पण कमी होणार नाही. स्व. बाळासाहेबांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं विनम्र अभिवादन ! अशा अश्याचाही पोस्ट राज ठाकरे यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटर वर केली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले अभिवादन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. यावेळी ते म्हणाले, महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू.

आदित्य ठाकरे यांची पोस्ट

 

यासह आदित्य ठाकरे यांनी देखीलजा, बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत बालपणीचा फोटो देखील शेअर केला आहे. आजा, तुझा आशीर्वाद हिच माझी ताकद, हिच माझी ऊर्जा! अशा आशयाची पोस्ट करत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सामना वृत्तपत्रात बाळासाहेबांबद्दल लिहलेल्या लेखाची स्तुती अमित ठाकरेंकडून करण्यात आली. ‘शब्दरचना कमाल… बाळासाहेब सांगावे ते राज साहेबांनीच… कमाल’ अशा आशयाची पोस्ट ट्विटरच्या माध्यमातून अमित ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts