ताज्या बातम्या

पोलीस दलात 14,000 रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी

Police recruitment
170

पोलीस भरतीची प्रतीक्षा संपली! राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत पोलीस दलातील एकूण १४,००० रिक्त पदांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. ही भरती अनेक महिन्यांनी पुढे आली असून, शहरी-ग्रामीण भागातील तरुणाईसाठी मोठी संधी आहे. पोलीस दलात मनुष्यबळाची कमतरता असल्याने कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी ही भरती अत्यंत गरजेची आहे. सरकारने तातडीने भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले असून, या भरतीसाठी वेळापत्रक आणि इतर तपशील लवकरच जाहीर होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts