Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; ‘या’ 5 देशांमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका
Top News

पंतप्रधान मोदी पुन्हा परदेश दौऱ्यावर; ‘या’ 5 देशांमध्ये होणार महत्त्वाच्या बैठका

pm narendra modi
76

PM Narednra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी ते पाच देशांचा दौरा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींचा हा परदेश दौरा सहा दिवसांचा असणार असून ते शुक्रवारपासून पाच देशांच्या दौऱ्यासाठी निघणार आहेत. ते या सहा दिवसांच्या दौऱ्यात स्वीडन (Sweden), इटली (Italy), संयुक्त अरब अमिरात (UAE), नेदरलँड्स (Nederland) आणि नॉर्वे (Norway) या देशांना भेट देणार आहेत.

हेही वाचा – “जर युरेनियम साठ्यांच्या जवळ गेला तर…”, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी, दिला गंभीर इशारा

तणाव आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी 5 देशांच्या दौऱ्यावर

अमेरिका आणि इराण या देशांमध्ये सुरू असलेल्या तणाव आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. संबंधित देशांसोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा उद्देश आहे. तर पंतप्रधान मोदी सगळ्यात आधी संयुक्त अरब अमिराती दौऱ्यावर जाणार आहेत. तिथे ते राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायद अल नाहयान यांची भेट घेणार आहेत. दोन्ही नेते द्विपक्षीय व्यापक सामरिक भागीदारी पुढे नेण्यावर आणि मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या संघर्षावर विचारविनिमय करतील. तर परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं आहे की, पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील व्यापार आणि गुंतवणुकीच्या संबंधांना चालना मिळण्यास मदत होणार आहे.

पंतप्रधान मोदी आपल्या परदेश दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात 15 ते 17 मे दरम्यान नेदरलँड्सला भेट देणार आहेत. तेथे पंतप्रधान मोदी राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांची भेट घेणार आहेत. ते डच पंतप्रधान रॉब झेटन यांच्याशीही चर्चा करणार आहेत. या भेटीमध्ये संरक्षण, सुरक्षा, नवोपक्रम, हरित हायड्रोजन, सेमीकंडक्टर आणि पाणी या क्षेत्रांमध्ये धोरणात्मक भागीदारी आणि सहकार्य मजबूत करण्यावर चर्चेत भर दिला जाईल.

नेदरलँड्सनंतर पंतप्रधान मोदी 17 ते 18 मे या दोन दिवसांच्या कालावधीसाठी स्वीडनला भेट देणार आहेत. पंतप्रधान मोदी त्यांचे स्वीडिश समकक्ष उल्फ क्रिस्टरसन यांच्या निमंत्रणावरून हा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदींच्या या दौऱ्यादरम्यान हरित परिवर्तन, कृत्रिम बुद्धिमत्ता, उदयोन्मुख तंत्रज्ञान, स्टार्टअप्स, लवचिक पुरवठा साखळी, संरक्षण, अवकाश, हवामान बदलावरील कृती आणि जन संबंध यांसारख्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा होईल.

पंतप्रधान मोदी नोर्वेमध्ये शिखर परिषदेत होणार सहभागी

यानंतर पंतप्रधान मोदी 18 ते 19 मे दरम्यान नॉर्वेमध्ये होणाऱ्या तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत. तिथे दोन्ही देशांच्या नेतृत्वामध्ये द्विपक्षीय चर्चा होणार आहे. पंतप्रधान मोदी राजे हॅराल्ड पंचम आणि राणी सोन्जा यांची भेट घेतील आणि पंतप्रधान जोनास गहर स्टोअर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.

आपल्या पाच देशांच्या दौऱ्याच्या अंतिम टप्प्यात, पंतप्रधान मोदी 19 ते 20 मे दरम्यान इटलीचा अधिकृत दौरा करणार आहेत. इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून ते हा दौरा करत आहेत. पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष सर्जिओ मॅटारेला यांची भेट घेतील आणि पंतप्रधान मेलोनी यांच्याशी चर्चा करतील. दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करणे हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts