Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे विशेष कार्यक्रम
Top News

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त प्रादेशिक परिवहन कार्यालय तर्फे विशेष कार्यक्रम

International Women's Day

International Women’s Day : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आज विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. “सक्षम महिला – सुरक्षित राष्ट्र” या ब्रीदवाक्याखाली हा कार्यक्रम पार पडला. अकोला प्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत महिला अधिकाऱ्यांनी पुढाकार घेत हा उपक्रम आयोजित केला होता.

हेही वाचा – महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची प्रेरणादायी कहाणी

महिलांवर कुटुंबासोबत समाजाचीही मोठी जबाबदारी

महिलांच्या सन्मान, सक्षमीकरण आणि सुरक्षित वाहतूक संस्कृतीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महिलांवर कुटुंबासोबत समाजाचीही मोठी जबाबदारी असते, त्यामुळे सुरक्षित वाहन संस्कृती निर्माण करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार

कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. उपस्थित महिलांना रस्ता सुरक्षा नियमांबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार देखील करण्यात आला.

वाहन चालवणाऱ्या काही महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचेही वाटप

यावेळी वाहन चालवणाऱ्या काही महिलांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हेल्मेटचेही वाटप करण्यात आले. या उपक्रमातून महिलांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती करण्याचा संदेश देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts