• Home
  • ताज्या बातम्या
  • विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी, आत्महत्या होती की घातपात ? शाळेवर गंभीर आरोप
Top News

विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीवरून मारली उडी, आत्महत्या होती की घातपात ? शाळेवर गंभीर आरोप

website 4

जयपूरमधून धक्कदायक बातमी समोर आली आहे. शहरातील एका प्रसिद्ध खाजगी शाळेतील चौथी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे. धक्कदायक म्हणजे या विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारल्याचे वृत समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र ही आत्महत्या होती की घातपात याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने शाळा प्रशासनावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलीचे नाव अमायरा असून ती नेहमीप्रमाणे शनिवारी शाळेत गेली. अमायरा इयत्ता ४थीत शिकत होती. तिचा शिकवणीचा वर्ग तळमजल्यावर होता. दुपारी १२ नंतर अमायरा बाथरूमला गेली. त्यानंतर ती शाळेच्या चौथ्या मजल्यावर गेली. चौथ्या मजल्याच्या एका रेलिंगला उभी राहून अमायराने खाली वाकून बघितलं. नंतर आजूबाजूला पाहायला आणि रेलिंगवर चढून खाली उडी मारली.

हे ही वाचा – २४ तासातील जयपूरमधील दुसरा मोठा भीषण अपघात! अनियंत्रित डंपरनं अनेक वाहनांना दिली धडक

या दुर्घटनेत अमायराचा मृत्यू झाला. ही संपूर्ण घटना शाळेतील कॅमेऱ्यात चित्रित झाली आहे. अमयाराच्या आत्महत्येनंतर शाळेतील शिक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केली. मृत मुलीच्या पालकांनी शाळेविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

शाळेकडून पुराव्यांशी छेडछाड?

मानसरोवर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लखन खटाना यांनी सांगितले की, प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्येची घटना वाटत असली तरी तिच्या कृतीमागील नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र पोलिस जेव्हा शाळेत पोहोचले, तेव्हा त्यांना एक धक्कादायक गोष्ट आढळली. ज्या जागी मुलगी पडली होती ती जागा आधीच स्वच्छ करण्यात आली होती. रक्ताचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. यामुळे पालकांचा संताप झाला असून त्यांनी शाळेवर पुराव्यांशी छेडछाड केल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पालकांचा आरोप

अमायराच्या पालकांनी शाळा प्रशासनाविरुद्ध FIR नोंदवला असून मृत्यू ‘संशयास्पद’ असल्याचे म्हटले आहे. घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणाची चौकशी करण्यात यावी, अशी त्यांची मागणी आहे. घटनेनंतरही नीरजा मोदी शाळेच्या प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही. या घटनेने खळबळ उडाली असून, तपासाचा अहवाल समोर आल्यानंतरच अमायराच्या मृत्यूमागील खरी कारणे उघड होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts