Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “अशा मनोवृत्तीच्या लोकांना…”, अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरे आक्रमक; केली मोठी मागणी
Top News

“अशा मनोवृत्तीच्या लोकांना…”, अशोक खरात प्रकरणावर सुनील तटकरे आक्रमक; केली मोठी मागणी

kharat tatkare

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदुबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. अशोक खरातने अनेक महिलांवर अत्याचार केले आहेत. विवाहित महिला, तरूणींचे अशोक खरातने लैंगिक शोषण केले आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून खरातविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. खरातने महिलांवर अत्याचार केले असून अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी खरातला अटक केली आहे. तर सध्या खरात प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे.

हेही वाचा – मध्यपूर्वेत तणाव शिगेला! इराणने अमेरिकेचे आणखी एक विमान पाडले, C-130 विमान कोसळल्याने अमेरिकेला धक्का

खरात प्रकरणावर काय म्हणाले सुनील तटकरे?

खरातचे काळे कारनामे सर्वांसमोर आले असून त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी लोकं करत आहेत. यामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी खरात प्रकरणावर संताप व्यक्त केला आहे. सुनील तटकरे यांनी खरातवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सुनील तटकरे म्हणाले की, अशोक खरातला फाशीची शिक्षा दिली पाहिजे. खरात हा व्यक्ती कोणीही असो अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे. तसेच हे खरात प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे, अशी मागणी तटकरेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले की, खरात प्रकरणात ज्या ज्या लोकांचा संबंध आहे त्यांच्यावरही कठोर कारवाई करावी. तसेच राज्य सरकारने विशेष तपास पथकाच्या माध्यमातून अशोख खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी, असंही तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,अशोक खरातने अनेक महिलांची फसवणूक करत त्यांचे लैंगिक शोषण केले आहे. तर त्याने अनेक लोकांची आर्थिक फसवणूक देखील केली आहे. याच ढोंगी अशोक खरातचे अनेक राजकीय नेत्यांसोबत, उद्योगपतींसोबत जवळचे संबंध होते. धर्माच्या नावाखाली खरातने अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तर अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्यांची पोलीस चौकशी करत होते. यामध्ये पोलिसांनी खरातचा मुलगा हर्षवर्धनला ताब्यात घेत त्याची दोन दिवस कसून चौकशी केली होती. चौकशीदरम्यान हर्षवर्धनने धक्कादायक माहिती पोलिसांना दिली आहे. त्याने पोलिसांसमोर कबूल केले की, आमच्या घरामध्ये दररोज मोठ्या प्रमाणात कॅश येत होती. ते पैसे कुठून येत होते याबाबत मला काहीही माहिती नाही. कारण या पैशांचे सर्व व्यवहार डॅड अशोक खरात यांच्याकडे होते. त्यांना प्रत्येक व्यवहाराची माहिती होती, अशी कबुली हर्षवर्धने दिली आहे.खरातच्या मुलाने दिलेल्या जबाबनंतर खरातने फक्त महिलांचा लैंगिक छळच केला नाही तर लोकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात केल्याचंही समोर आलं आहे.

हर्षवर्धनची चौकशी केल्यानंतर त्याला सोडण्यात आले होते. तर चौकशी झाल्यानंतर हर्षवर्धनने पोलिसांना कोणतीही माहिती न देता तो अचानक शहरातून गायब झाला आहे. त्यामुळे आता नाशिक पोलीस खरातच्या पत्नीचा आणि खरातच्या मुलागा शोध घेत आहेत. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts