• Home
  • देश
  • इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंच्या मृत्यूचे पडसाद भारतात, केंद्र सरकार अलर्ट मोडवर
ताज्या बातम्या

इराणचे सर्वोच्च नेते खामेनेईंच्या मृत्यूचे पडसाद भारतात, केंद्र सरकार अलर्ट मोडवर

ali

Iran Supreme Leader Khameneni Dies | अमेरिका-इस्त्रायल (America-Israel) या दोन देशांनी मिळून इराणवर (Iran) हल्ला केला होता. या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेईंचा (Ayatollah Ali Khameneni) मृत्यू झाला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर संपूर्ण जगभरात विरोध प्रदर्शन सुरू आहे. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूचे पडसाद भारतातही (India) उमटले आहेत. त्यामुळे सध्या केंद्र सरकार अलर्ट मोडवल आले आहे.

हेही वाचा – “…तोपर्यंत अमेरिकेचे हल्ले सुरूच राहणार”, डोनाल्ड ट्रम्प यांनी दिले युद्ध पेटण्याचे संकेत

भारतातील अनेक भागांमध्ये शिया समुदायातील मुस्लिमांनी खामेनेईंच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. यामध्ये श्रीनगपासून ते लखनौपर्यंत शिया मुस्लीम समुदायातील लोक या घटनेचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहे. शिया मुस्लीम समुदायातील लोकांनी अमेरिका-इस्त्रायलविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.

खामेनेईंच्या मृत्यूनंतर भारतात लोक रस्त्यावर उतरल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ज्या भागांमध्ये निषेध व्यक्त करण्यासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत त्या भागांमध्ये केंद्र सरकारनं निर्बंध लावले आहेत. सरकारने श्रीनगर भागात निर्बंध लावले आहेत, तर दुसरीकडे लाल चौकातील परिसर प्रशासनानं सील केला आहे. तसेच शाळा आणि महाविद्यालये पुढील 2 दिवसांसाठी बंद ठेवण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts