• Home
  • महाराष्ट्र
  • बायको कुठे लपून बसलीये? विचारताच अशोक खरातनं दिलं विचित्र उत्तर, पोलिसही चक्रावले
Top News

बायको कुठे लपून बसलीये? विचारताच अशोक खरातनं दिलं विचित्र उत्तर, पोलिसही चक्रावले

kalpana kharat ashok kharat

Ashok Kharat Case | नाशिकचा (Nashik) भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सध्या अशोक खरात प्रकरणाचा संपूर्ण तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. तसेच पोलिसही ढोंगी अशोक खरातची कसून चौकशी करत आहेत. मात्र, अशोक खरात हा पोलिसांना हवा तसा प्रतिसाद देत नसल्याची माहिती समोर येत आहे. अशातच आता पोलिसांनी खरातला त्याच्या बायकोबाबत प्रश्न विचारला असता त्याने पोलिसांना विचित्र पद्धतीने उत्तर दिलं आहे, ज्यामुळे पोलिसही हैराण झाले आहेत.

हेही वाचा – धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू; वयाच्या 40 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अशोक खरातला अटक केल्यानंतर काही दिवसांनी त्याची पत्नी कल्पना खरात ही फरार झाली आहे. अशोक खरातला अटक केल्यानंतर विशेष तपास पथक खरातच्या नाशिकमधील बंगल्यावर मध्यरात्री गेले होते. यावेळी अधिकाऱ्यांनी गेट ठोठावले असता कोणाही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी शेजारील बंगल्यावरून उडी मारून खरातच्या बंगल्यात प्रवेश केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना खरातची बायको फरार असल्याची गोष्ट समजली. तर बंगल्यात तेव्हा खरातचा मुगला हर्षवर्धन उपस्थित होता, ज्याला अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. चौकशीनंतर हर्षवर्धनला सोडून देण्यात आलं होतं. मात्र, चौकशीनंतर पोलिसांना कसलीही माहिती न देता हर्षवर्धनही फरार झाला. सध्या पोलीस कल्पना खरात आणि हर्षवर्धनचा शोध घेत आहेत.

अशोक खरातने पोलिसांना पत्नी कल्पना खरातबाब काय दिलं उत्तर?

खरातची पत्नी कल्पना खरात ही नेमकी कुठे आहे? याचा काहीही थांगपत्ता लागत नाहीये. पोलिसांनी तिचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी आपली पथके रवाना केली आहेत. तसेच दुसरीकडे कल्पना खरातने काही दिवसांपूर्वीच कोर्टाकडे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, अजूनही तिला अटकपूर्व जामीन मिळालेला नाहीये. तसेच कल्पना खरातचा कुठेच ठावठिकाणा लागत नसल्यामुळे एसआयटीने पुन्हा एकदा अशोक खरातची चौकशी केली. यावेळी एसआयटीने खरातला कल्पना खरात कुठे लपून बसली आहे? असा प्रश्न विचारला. त्यावर “माझी पत्नी कुठे आहे हे देवालाच माहिती”, असं अजब उत्तर खरातने दिले आहे.

ढोंगी अशोक खरातने बायकोबाबत जरी अजब उत्तर दिलं असलं तरी मुलगा हर्षवर्धनसाठी त्याने व्याकूळता दाखवली. “मला माझ्या मुलाची काळजी वाटत आहे. मला एकदा त्याच्याशी फोनवर बोलू द्या”, अशी विनंती खरातने पोलिसांकडे केली असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, अशोक खरातची पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असून आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. तिसऱ्या गुन्ह्यासाठी खरातला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तर आजच्या सुनावणीत अशोक खरात प्रकरणावर नेमका काय निर्णय होणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. आज एसआयटी त्यांना सापडलेले सर्व पुरावे कोर्टात सादर करणार आहे त्यामुळे खरातच्या अडचणी आणखी वाढणार आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts