Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • २५ लाख वर्षाला कमावत असाल तरच लग्न? मुलींच्या अपेक्षेने सर्वांनाच धक्का!
लाईफस्टाईल

२५ लाख वर्षाला कमावत असाल तरच लग्न? मुलींच्या अपेक्षेने सर्वांनाच धक्का!

Marriage Salary Expectations
125

Marriage Salary Expectations : लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात असं म्हणतात… पण आजकालच्या जगात या गाठी स्वर्गात नाही, तर बँक बॅलन्स आणि सॅलरी पॅकेज पाहून ठरवल्या जात आहेत… होय, तुम्ही बरोबर ऐकलं. जर तुम्ही मुलगा असाल आणि तुमचं वार्षिक उत्पन्न २५ लाख रुपये नसेल, तर कदाचित तुमच्या लग्नाची सनई वाजणं कठीण आहे… एका नामांकित आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्मच्या सर्वेक्षणातून अशी धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे, ज्याने संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण याच हाय-फाय अपेक्षेचा पंचनामा करणार आहोत.

लग्नासाठी २५ लाखांचे वार्षिक उत्पन्न आवश्यक असल्याचे सर्वेक्षणात समोर

ब्लाइंड या प्रसिद्ध प्रोफेशनल सोशल नेटवर्कने भारतातील नोकरदार तरुण-तरुणींचा एक विशेष सर्व्हे केला. या सर्वेचा मुख्य उद्देश होता, भारतात लग्नासाठी आर्थिक स्थैर्य किती महत्त्वाचं आहे? आणि जेव्हा या सर्वेचे निकाल समोर आले, तेव्हा अनेकांचे डोळे पांढरे झाले.

या सर्वेक्षणात आढळलेली सर्वात पहिली आणि मोठी गोष्ट म्हणजे ६९% अविवाहित मुलींच्या मते, लग्नासाठी मुलाचे वार्षिक उत्पन्न कमीत कमी २५ लाख रुपये असणे अनिवार्य आहे. म्हणजेच, जर मुलाचा महिना सव्वा दोन लाख रुपयांच्या घरात नसेल, तर तो मॅरेज मटेरियल नाही, असा स्पष्ट संकेत या सर्वेतून पुढे आला आहे.

हेही वाचा : डॉ. प्रकाश आमटे यांचा जीवनप्रवास : डॉक्टरकी सोडून जंगलात का गेले? हेमलकसातील संघर्ष ते समाजसेवेचा प्रेरणादायी प्रवास

६९% अविवाहित महिलांनी व्यक्त केली २५ लाखांची अपेक्षा ( Marriage Salary Expectations )

पण या सर्वेक्षणात एक मजेशीर आणि डोळे उघडणारा विरोधाभासही समोर आला आहे. एकीकडे ६९% अविवाहित मुली २५ लाखांची अट ठेवत आहेत. तर दुसरीकडे, ज्या लोकांची आधीच लग्न झालीयेत, त्यांच्यापैकी केवळ ४८% लोकांनी या आकड्याला सहमती दर्शवली आहे. म्हणजेच, लग्नाआधीचे स्वप्न आणि लग्नानंतरची वास्तविकता यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे, हेच यातून सिद्ध होतं.

मुलींच्या अपेक्षा इथेच थांबत नाही… सर्वेक्षणात सहभागी झालेल्या तब्बल २९% लोकांनी तर मुलाचे उत्पन्न वार्षिक ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. पण प्रश्न असा पडतो की, अचानक भारतीय मुलींच्या अपेक्षा एवढ्या का उंचावल्या? याचं उत्तर दडलंय बदलत्या जीवनशैलीत.

पहिलं कारण – मेट्रो शहरांमधील गगनाला भिडलेली महागाई आणि घरांचे मोठमोठे भाडे.
दुसरं कारण – आयटी आणि कॉर्पोरेट सेक्टरमधील वाढती स्पर्धा आणि लक्झरी लाईफस्टाईलची लागलेली चटक.
आणि तिसरं कारण – आर्थिक स्वावलंबन. आजच्या मुली स्वतः सक्षम आहेत, त्यामुळे त्यांना आपल्या जोडीदाराकडूनही तितक्याच भक्कम पैशांची अपेक्षा आहे.

बदलत्या काळात विवाहाच्या अपेक्षांचे बदलते चित्र ( 25 Lakh Salary for Marriage )

आता या सर्वेक्षणामागचं सर्वात मोठं सत्य समजून घेणं गरजेचं आहे. हा सर्व्हे देशातील सर्वसामान्य तरुणांचा नाही, तर प्रामुख्याने ग्लोबल टेक कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या १,४७३ उच्चशिक्षित आयटी प्रोफेशनल्सचा आहे. भारतातील एकूण सरासरी उत्पन्नाचा विचार केला, तर २५ लाख रुपये कमवणारे तरुण केवळ १ ते २ टक्क्यांच्या घरात आहेत. त्यामुळे हा सर्व्हे संपूर्ण भारताचे चित्र दर्शवत नसला, तरी कॉर्पोरेट जगतातील बदलती मानसिकता नक्कीच समोर आणतो.

Indian Marriage Trends : तर असा आहे हा हाय-प्रोफाइल लग्नाचा नवा ट्रेंड…. पूर्वी गुण जुळवले जायचे, स्वभाव पाहिला जायचा, पत्रिका मॅच केली जायची… पण आता पत्रिकेपेक्षा पे-स्लिप जास्त मॅच केली जातेय. आर्थिक सुरक्षा महत्त्वाची आहेच, पण लग्नाचा पाया फक्त पैशांवरच टिकू शकतो का? हा खरा प्रश्न आहे. २५ लाखांचं हे पॅकेज सुखी संसाराची गॅरंटी देईल की नाही, हे काळच सांगेल. पण सध्या तरी या आकड्याने अविवाहित मुलांची झोप नक्कीच उडवली आहे….

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune. Awarded By : 🥇The Best Digital Marketer And Technologist Award🏆

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts