Breaking News :
  • Home
  • Top News
  • रस्त्यावरील भजी, वडे, समोसे आवडीने खाताय? ‘या’ चुकीमुळे वाढू शकतो गंभीर आजारांचा धोका
लाईफस्टाईल

रस्त्यावरील भजी, वडे, समोसे आवडीने खाताय? ‘या’ चुकीमुळे वाढू शकतो गंभीर आजारांचा धोका

Street Food Health Risks
67

Street Food Health Risks: जर तुम्ही वारंवार रस्त्यावरील भजी, वडे आणि समोसे आवडीने खात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार वाढत असून, बाहेरील तळलेले पदार्थ नियमित खाल्ल्यास हृदयविकार आणि कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

रस्त्यावरील गाड्या, हॉटेल्स आणि फास्टफूड सेंटरवर मिळणारे गरमागरम भजी, वडे, समोसे किंवा कचोरी अनेकांचे आवडते पदार्थ आहेत. मात्र, हे पदार्थ तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तेलाकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी महागात पडू शकते. तज्ज्ञांच्या मते, एकाच खाद्यतेलाचा वारंवार वापर केल्यास त्यामध्ये घातक रासायनिक बदल होतात, ज्यामुळे पोटाचे विकार, हृदयविकार आणि दीर्घकाळात कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढू शकतो.

हेही वाचा: उघड्या मॅनहोलमध्ये पडून एका मुंबईकरांचा मृत्यू; मोबाईलवर बोलत असतानाच घडली दुर्घटना

वारंवार गरम केलेले तेल का धोकादायक?

खाद्यतेल वारंवार गरम केल्याने त्यामध्ये ऑक्सिडेशन आणि रासायनिक विघटनाची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे तेलात शरीरासाठी हानिकारक संयुगे तयार होतात. यामुळे तेलाची गुणवत्ता कमी होते आणि ते आरोग्यासाठी अपायकारक ठरते.

‘टोटल पोलर कंपाउंड्स’ म्हणजे काय?

तेल अनेक वेळा गरम केल्यावर त्यामध्ये टोटल पोलर कंपाउंड्स (TPC) नावाची रासायनिक संयुगे वाढतात. अन्न सुरक्षा निकषांनुसार या संयुगांचे प्रमाण २५ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यास ते तेल स्वयंपाकासाठी वापरणे सुरक्षित मानले जात नाही.

कोणते आजार होऊ शकतात?

अपचन, अॅसिडिटी आणि पोटाचे विकार
लठ्ठपणा वाढणे
कोलेस्ट्रॉल वाढणे
हृदयविकाराचा धोका
यकृतावर ताण
शरीरात दाह (Inflammation) वाढणे
पेशींना हानी पोहोचवणारे फ्री रॅडिकल्स तयार होणे
दीर्घकाळात कर्करोगाचा धोका वाढणे
तेल खराब झाल्याचे कसे ओळखाल?

खालील लक्षणे दिसल्यास ते तेल पुन्हा वापरणे टाळावे.

तेलाचा रंग गडद किंवा काळपट होणे
तीव्र किंवा विचित्र वास येणे
गरम करताच जास्त धूर निघणे
तेल चिकट किंवा घट्ट होणे
पदार्थाची चव आणि पोत बदलणे

तज्ज्ञांचा सल्ला

आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर शक्यतो ताज्या तेलात तयार केलेले पदार्थ खावेत. रस्त्यावरील किंवा हॉटेलमधील तळलेले पदार्थ वारंवार खाणे टाळावे. खाद्यतेलाचा पुनर्वापर कमी केल्यास पोट, हृदय आणि इतर अवयवांवरील धोका मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts