Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून आणलेलं 79 कोटी रुपयांचं कोकेन जप्त; डीआरआयची मुंबई विमानतळावर कारवाई, दोन महिला ताब्यात
Mumbai

खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून आणलेलं 79 कोटी रुपयांचं कोकेन जप्त; डीआरआयची मुंबई विमानतळावर कारवाई, दोन महिला ताब्यात

टीम इंडियाचा सराव सुरु असताना मैदानात घुसला साप अन्. 1 1

मुंबई : डीआरआय मुंबईनं ड्रग्ज तस्करीचं एक मोठा रॅकेट उद्ध्वस्त केलं आहे. गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर तब्बल 79 कोटी रुपयांचं कोकेन जप्त करण्यात आलं. याप्रकरणी दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय? :

डीआरआय मुंबईच्या विभागीय युनिटनं बँकॉकहून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या दोन महिला प्रवाशांकडून बेकायदेशीरपणे तस्करीकरुन आणलेलं 7.95 किलो कोकेन जप्त केलं आहे. ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत अंदाजे 79.5 कोटी रुपये इतकी आहे. प्राप्त माहितीनुसार बँकॉकहून मुंबईत आलेल्या दोन महिला प्रवाशांना डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी विमानतळावरच रोखलं. तिथं त्यांच्या सामानाची सविस्तर तपासणी केली असता खेळण्यांच्या पॅकेटमध्ये लपवून ठेवलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. खेळण्यांच्या बॉक्समध्ये पांढऱ्या पावडरीच्या तब्बल 22 विटांच्या आकाराची पॅकेट्स दडवून ठेवण्यात आली होती. ही सारी पॅकेट्स जप्त करुन त्यांची जागेवरच प्राथमिक चाचणी करण्यात आली. एनडीपीएस फील्ड किटसह केलेल्या चाचणीत हा पदार्थ कोकेन असल्याचं समोर आलं.

प्रकरणाची सखोल चौकशी सुरु :

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत या दोन्ही महिलांना एनडीपीएस कायदा 1985 अंतर्गत अटक करण्यात आली असून या दोन्ही महिलांना कोर्टात हजर केलं असता कोर्टानं त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. डीआरआय याप्रकरणी अधिक तपास करत असून, हे एक मोठं तस्करीचं रॅकेट कार्यरत असल्याचा तपास यंत्रणेला संशय आहे. प्राथमिक तपासातून हे प्रकरण आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ तस्करांच्या टोळीशी संबंधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. अटक केलेल्या आरोपींच्या मोबाइलमधील माहितीत सीमाशुल्क अधिकाऱ्यांना अनेक पुरावे सापडले आहेत. त्यात काही परदेशी नागरिकांचाही समावेश असून, या संपूर्ण टोळीचा शोध सुरु आहे. दक्षिण अमेरिकेतून विविध मार्गांनी अमली पदार्थांचं जगभरात वितरण केलं जातं. गेल्या काही महिन्यांपासून भारतात बँकॉकमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी केली जात असल्याचं निदर्शनास आलंय. भारतातून थायलंडमध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटकांचं नियमित ये-जा असल्याचं तपास यंत्रणांच्या निदर्शनास आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts