• Home
  • राजकारण
  • नामनिर्देशन पत्र वितरणाचे तीनही दिवस मिळून एकूण ९ हजार ०४९ अर्जांचे वितरण
Mumbai

नामनिर्देशन पत्र वितरणाचे तीनही दिवस मिळून एकूण ९ हजार ०४९ अर्जांचे वितरण

Election officials distributing nomination forms to candidates during the nomination process

nomination forms distribution : बृहन्‍मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या अनुषंगाने आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ०४० नामनिर्देशन अर्जांचे वितरण करण्‍यात आले आहे. तर, ०७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत.

माननीय राज्‍य निवडणूक आयोग, महाराष्‍ट्र यांनी जाहीर केलेल्‍या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ – २६ च्या कार्यक्रमानुसार, उमेदवारांना नामनिर्देशन पत्रे देण्यास मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झाली आहे. मंगळवार, दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी एकूण ४ हजार १६५ नामनिर्देशन अर्जांचे तर, बुधवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी २३ निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांतून मिळून एकूण २ हजार ८४४ नामनिर्देशन अर्जांचे वितरण झाले होते. तसेच, ०२ नामनिर्देशन पत्र दाखल झाली होती.

हे ही वाचा : आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आज भरणार उमेदवारी अर्ज; लढवणार महापालिका निवडणूक

नामनिर्देशन पत्रे वितरणाच्‍या तिस-या दिवशी म्‍हणजे आज दिनांक २६ डिसेंबर २०२५ रोजी २ हजार ०४० नामनिर्देशन पत्रांचे वितरण झाले आहे. तर, ०७ नामनिर्देशन पत्र दाखल झाली आहेत. नामनिर्देशन पत्रे स्‍वीकारण्‍याचा कालावधी दिनांक २३ डिसेंबर ते दिनांक ३० डिसेंबर २०२५ या दरम्‍यान दररोज सकाळी ११ ते सायंकाळी ५ पर्यंत आहे. त्‍यानुसार, आजअखेर एकूण मिळून ९ नामनिर्देशन पत्रे प्राप्‍त झाली आहेत.

प्रशासकीय विभाग / वितरण केलेले नामनिर्देशन पत्र संख्‍या/ प्राप्‍त नामनिर्देशन पत्रे याची माहिती पुढीलप्रमाणे –

१) ए + बी + ई विभाग (RO २३) – १८९ / ३ प्राप्‍त

२) सी + डी विभाग (RO २२) – ११८

3) एफ दक्षिण विभाग (RO २१ ) – ८३

४) जी दक्षिण विभाग (RO २०) – ७३ / १ प्राप्‍त

५) जी उत्‍तर विभाग (RO १९) – १०६

६) एफ उत्‍तर विभाग (RO १८) – ७२

७) एल विभाग (RO १७) – ७६ / १ प्राप्‍त

८) एल विभाग (RO १६) – ४३

९) एम पूर्व विभाग (RO १५) – ८९

१०) एम पूर्व + एम पश्चिम (RO १४) – ११८

११) एन विभाग (RO १३) – ६५

१२) एस विभाग (RO १२) – ७६

१३) टी विभाग (RO ११) – ७७

१४) एच पूर्व विभाग (RO १०) – ८६

१५) के पूर्व + एच पश्चिम विभाग (RO ९) – १५८

१६) के पश्चिम विभाग + के पूर्व (RO ८) – ११० / १ प्राप्‍त

१७) के पश्चिम विभाग (RO ७) – ९७

१८) पी दक्षिण विभाग (RO ६) – ९०

१९) पी पूर्व विभाग (RO ५) – ९२

२०) पी उत्‍तर विभाग (RO ४) – ३४ / १ प्राप्‍त

२१) आर दक्षिण विभाग (RO ३) – ११२

२२) आर मध्‍य विभाग (RO २) – ४६

२३) आर उत्‍तर विभाग (RO १) – ३०

एकूण – २०४० वितरित / ७ प्राप्‍त

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts