Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • पुण्यातील मेळाव्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सारा’ला सुवर्णपदक: ‘गुन्हे शोध’मध्ये उत्कृष्ट कामगिरी
Pune

पुण्यातील मेळाव्यात गडचिरोली पोलिसांच्या ‘सारा’ला सुवर्णपदक: ‘गुन्हे शोध’मध्ये उत्कृष्ट कामगिरी

24 9 11

पुणे येथे आयोजित 20 व्या महाराष्ट्र राज्य पोलीस कर्तव्य मेळाव्यात गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने गुन्हे शोधक या प्रकारात सर्वोत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले.

राज्यात शहरांचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून गुन्हेगारीचे स्वरुपही बदलत चालले आहे. या बदलत्या परिस्थितीत पोलीस आपले कर्तव्य यशस्वीरित्या पार पडण्याचा कसोशीने प्रयत्न करत आहेत. कंट्रोल रूम असो की पोलीस ठाणे, कोणत्या क्षणी कोणती माहिती वा तक्रार पोलिसांकडे येईल, याचा नेम नसतो. कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी पोलिसांना नेहमीच सज्ज राहावे लागते. कौशल्याने तपास कसा करावा; तसेच विविध प्रकारचे अद्ययावत ज्ञान ठेवावे लागते. त्यासाठीच पुणे येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्याचे आयोजन केले होते.

पोलिसांनी आपले गुणवत्ता कौशल्य, कार्यक्षमता व दर्जा वाढविणे हा या मेळाव्यामागील उद्देश होता. राज्य गुन्हे अन्वेषण विभागातर्फे या मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असते. या मेळाव्याच्या निमित्ताने काही स्पर्धेही घेण्यात येतात. त्यात एकूण 25 वेगवेगळ्या विभागांनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यात पोलिसांच्या श्वानांमधील हुशारी तपासणाऱ्या स्पर्धांचाही त्यात समावेश होता.

पाच दिवस चाललेल्या विविध स्पर्धेमध्ये गडचिरोली पोलीस दलातील श्वान सारा हिने गुन्हेशोधक प्रकारात इतर जिल्ह्यांना श्वानांना मागे टाकत सुवर्णपदक पटकाविले. तसेच नागपूर येथे होणा­ऱ्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यातील श्वान स्पर्धेकरीता महाराष्ट्रातून तिची निवड झाली आहे. याबद्दल गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी श्वानपथकाचे प्रभारी अधिकारी ओमप्रकाश बोरेवार, पदक प्राप्त श्वान सारा, श्वान हस्तक पोहवा राजेंद्र कौशिक, पोहवा अर्जुन परकीवार यांचे अभिनंदन करत भविष्यात अशीच कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts