Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • 1 हजार किमी अंतर पार करत सूड; कोपरीगावात तरुणाची चाकूने हत्या
Mumbai

1 हजार किमी अंतर पार करत सूड; कोपरीगावात तरुणाची चाकूने हत्या

Police investigation after youth stabbed to death in Koparigaon

Koparigaon youth murder : नवी मुंबईतील कोपरीगाव येथे मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास तरुणांच्या एका टोळीने मिळून अमित यादव (वय २०) याची निर्घृण हत्या केली. आरोपींनी अमितच्या छाती, पोट, कंबर आणि गळ्यावर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर सर्व आरोपी घटनास्थळावरून फरार झाले होते.

माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने एक आरोपी तात्काळ अटक करण्यात आली. त्यानंतर सतत शोधमोहीम राबवत पोलिसांनी आतापर्यंत १० जणांना अटक केली असून, त्यामध्ये ६ प्रौढ आणि १ अल्पवयीन मुलगा आहे. आणखी एक अल्पवयीन मुलगा अद्याप फरार आहे.

हे ही वाचा : संगमनेर शहरात कोयता गँगची दहशत; तीन आरोपींना अटक

एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी सांगितले की, अमित यादव आपल्या आणखी तीन मित्रांसोबत अजमेर शरीफला गेला होता. ते चौघेही एकाच धर्मशाळेत राहत होते. त्याच ठिकाणी कोपरखैरणे येथील रहिवासी सोहेल शेख आपल्या दोन मित्रांसोबत आला होता. रात्री झोपण्याच्या जागेवरून दोन्ही गटांत वाद झाला.

यानंतर दोन्ही गट नवी मुंबईत परतले. मंगळवारी रात्री अमित यादव बोनकोडे गावात आपल्या इतर मित्रांसोबत बसलेला असताना सोहेल शेख तेथे आला. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि अमित कोपरीगावात परत गेला. काही वेळाने सोहेल आपल्या अनेक मित्रांसोबत साईबाबा मंदिराजवळ पोहोचला आणि अमितवर हल्ला करून त्याला रक्तबंबाळ केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी अमितला रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts