Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • अशोक खरात प्रकरण रुपेरी पडद्यावर; दीपाली सय्यद चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार
मनोरंजन

अशोक खरात प्रकरण रुपेरी पडद्यावर; दीपाली सय्यद चाकणकरांच्या भूमिकेत झळकणार

Ashok Kharat Movie

Bhondu Baba Ashok Kharat Movie: नाशिकमध्ये गाजलेल्या भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची चर्चा रंगू लागली आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली होती. महिलांची फसवणूक आणि अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या कथित प्रकारांमुळे हे प्रकरण चर्चेचा विषय ठरलं होतं.

आता या संपूर्ण घटनाक्रमावर आधारित चित्रपट तयार केला जात असल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटात बिग बॉस फेम अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दिपाली सय्यद महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे.

हेही वाचा: UGC NET करेक्शन विंडो सुरू; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार सुधारणा, उमेदवारांसाठी शेवटची संधी!

रुपाली चाकणकर यांची भूमिका साकारणार कोण?

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेसारखं एक महत्वाचं पात्र असू शकतं, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र चित्रपट निर्मात्यांकडून किंवा अभिनेत्रींकडून याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

दीपाली सय्यद

दरम्यान, दीपाली सय्यद यांनी एका मुलाखतीत बोलताना समाजात अशा भोंदू प्रवृत्तींपासून सावध राहण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. तसेच त्या या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसणार असल्याचं संकेत त्यांनी दिले. मात्र नेमकी भूमिका काय असेल, याबाबत त्यांनी खुलासा टाळला.

या चित्रपटातून अशोक खरात प्रकरणातील अनेक घडामोडी आणि त्यामागील कथित वास्तव मोठ्या पडद्यावर मांडलं जाणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हा चित्रपट आणि त्यातील कलाकारांविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts