• Home
  • मनोरंजन
  • यश, परी, नेहा हे त्रिकुट पुन्हा एकदा येणार एकत्र; आगामी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

यश, परी, नेहा हे त्रिकुट पुन्हा एकदा येणार एकत्र; आगामी चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

Yash Pari Neha Upcoming Film

Yash Pari Neha Upcoming Film : ‘माझी तुझी रेशीमगाठया मालिकेत दिसलेले पात्र परी, यश आणि नेहा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबाबत जन्मदिनाच्या दिवशीच श्रेयस तळपदे यांनी महत्वपूर्ण घोषणा केली आहे. लवकरच त्यांचा नवीन चित्रपट प्रदर्शित होणार असल्याची माहिती सोशल मीडियावरून मिळाली.

माझी तुझी रेशीमगाठ ही मालिका प्रचंड गाजली होती. या मालिकेती सर्वात छोटे पात्र म्हणजे परी. हे पात्र या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचले होते. या मालिकेमध्ये परीच्या आईच्या भूमिकेत प्रार्थना बेहेरे होत्या. परी हे पात्र साकारणारी बालकलाका मायरा वायकुल ही या मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्ध झाली. या मालिकेनंतर तीने अनेक मालिकांमध्ये आणि चित्रपटात देखील महत्वपूर्ण भूमिका साकारली. यासह मालिकेतील तिसरे पात्र म्हणजे यश. यश हे पात्र श्रेयस तळपदे यांनी साकारले होते. यश, परी आणि नेहा या त्रिकुटाने या मालिकेच्या माध्यमातून आपले स्थान पटकावले.

आता हे त्रिकुट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता श्रेयस तळपदे यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या दिवशी चाहत्यांना मोठं गिफ्ट दिले आहे. श्रेयसने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर आगामी चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्ट मध्ये प्रत्येक महिषासुरासाठी….. एक मर्दिनी जन्म घेतेच असा आशय लिहिण्यात आला आहे. या चित्रपट आपल्याला सेम केमिस्ट्री, सेम त्रिकुट पाहायला मिळेल. श्रेयस तळपदे प्रस्तुत अॅफ्लुएन्स मोशन पिक्चर्स प्रा. लि. आणि ओडीआय ग्रुप बॅनर यांच्या माध्यमातून हा सिनेमा तयार करण्यात येणार आहे.

हे ही वाचापद्म पुरस्कार २०२६ ची घोषणा! महाराष्ट्रातील खालील व्यक्तींचा पुरस्कारने सन्मान

या आगामी चित्रपटाचे नाव मर्दिनी असं असून या चित्रपटाच्या माध्यमातून नारी सामर्थ्याची गाथा दाखवण्यात येणार आहे. मर्दिनी हा चित्रपट 3 जुलै 2026 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटाची आता सर्वत्र चर्चा सुरु आहे. या चित्रपटात श्रेयस, परी आणि प्रार्थना या त्रिकूटासोबतच जितेंद्र जोशी, अभिजीत खांडकेकर, राजेश भोसले यांची देखील महत्वपूर्ण भूमिका असणार आहे. हा चित्रपट अजय मयेकर यांनी दिगदर्शित केला असून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts