Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेनेसह काँग्रेस-ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा आज होणार भाजपात प्रवेश
राजकारण

मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे सेनेसह काँग्रेस-ठाकरे गटातील पदाधिकाऱ्यांचा आज होणार भाजपात प्रवेश

Maharashtra Politics
3

सचिन राणे, वाशिम

Maharashtra Politics: वाशिम जिल्ह्याच्या राजकारणात आज मोठी घडामोड घडणार असून, भारतीय जनता पक्षाकडून विविध पक्षांतील प्रभावी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशात महायुतीतील भाजपचे मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यातील पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील अनेक पदाधिकारीही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यामुळे या पक्षप्रवेशाची जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

आज दुपारी १ वाजता आमदार श्याम खोडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे. जिल्ह्यातील अनेक माजी लोकप्रतिनिधी, कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे पदाधिकारी, पंचायत समितीचे माजी सदस्य, सरपंच आणि १०० हून अधिक कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बेकायदा धर्मांतरावर कडक कारवाई, जाणून घ्या आंतरधर्मीय विवाहातील मुलांसाठीही नवे नियम

भाजपमध्ये प्रवेश

भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट चे माजी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग कोठाळे, काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते तसेच वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती महादेव काकडे, उपसभापती गोवर्धन चव्हाण, शिवसेना एकनाथ शिंदे गटचे माजी जिल्हाप्रमुख तथा माजी जिल्हा परिषद सभापती विजय खानझोडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन डोफेकर, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य विश्वास गोदमले, भागवत येवले, भारत व्यवहारे, एन. डी. राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस मंगरुळपीर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भास्कर शेगीकर यांचा समावेश आहे. याशिवाय पंचायत समितीचे माजी सभापती, माजी सदस्य, विविध गावांतील सरपंच आणि शंभरहून अधिक पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वात महत्त्वाची बाब

या पक्षप्रवेशातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भाजपने विरोधी पक्षांतील नेत्यांसोबतच स्वतःच्या महायुतीतील मित्रपक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्या पदाधिकाऱ्यांनाही पक्षात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महायुतीतील स्थानिक राजकीय समीकरणांवर याचे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रपक्षांतील पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये होत असलेला प्रवेश हा जिल्ह्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, या सामूहिक पक्षप्रवेशामुळे वाशिम जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, येत्या काही दिवसांत आणखी काही मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जात आहे.

FAQs

1. वाशिममध्ये भाजपमध्ये कोणत्या पक्षांचे पदाधिकारी प्रवेश करणार आहेत?
उत्तर: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

2. पक्षप्रवेश सोहळा कधी आणि कुठे होणार आहे?
उत्तर: आज दुपारी 1 वाजता मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे.

3. या पक्षप्रवेशाचे राजकीय महत्त्व काय आहे?
उत्तर: महायुतीतील मित्रपक्षांच्या पदाधिकाऱ्यांचाही भाजपमध्ये प्रवेश होत असल्याने वाशिम जिल्ह्यातील स्थानिक राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

4. या पक्षप्रवेशामुळे भाजपला काय फायदा होऊ शकतो?
उत्तर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपची संघटनात्मक ताकद वाढवणे आणि जिल्ह्यातील राजकीय प्रभाव मजबूत करणे हा या पक्षप्रवेशामागील प्रमुख उद्देश मानला जात आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts