• Home
  • राजकारण
  • मोदींच्या आवाहनावर राजकीय भडका! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून चंद्रकांत पाटीलांवर हल्लाबोल
Top News

मोदींच्या आवाहनावर राजकीय भडका! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून चंद्रकांत पाटीलांवर हल्लाबोल

Jitendra Awhad

Jitendra Awhad: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची इंधन बचत, अनावश्यक खर्च टाळणे आणि संसाधनांचा मर्यादित वापर करण्याचे केलेले आवाहन सध्या देशभर चर्चेचा विशेष ठरत आहे. या वक्तव्यावर आता राज्यातील राजकारणही तापले असून विरोधकांकडून केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.

ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार गट) चे आमदार जितेंद्र आव्हाडा यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन करत सरकारवर निशाणा साधला. पेट्रोल- डिझेलचा वापर कमी करण्याच्या आवाहनाच्या निषेधार्थ ते थेट घोड्यावर बसून ठाणे महापालिकेत पोहोचले. त्यांच्या या आंदोलनाची शहरात मोठी चर्चा रंगली.

हेही वाचा: तुम्हीही सतत फोन 100% चार्ज करता? मग ‘20-80 नियम’ जाणून घ्या, नाहीतर बॅटरी होईल खराब!

माध्यमांशी बोलताना म्हणाले….

यावेळी माध्यमांशी बोलताना आव्हाड यांनी भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर उपरोधिक टीका केली. ” तेल कमी वापरण्याचा सल्ला देणाऱ्यांनी आधी स्वतःपासून सुरुवात करावी,” असे म्हणत राज्यातील वरिष्ठ नेते चंद्रकांत पाटीलवर निशाणा साधला.

आंदोलनादरम्यान “सत्ताधाऱ्यांनी सरकारी वाहतूक वापरावी”, “जनतेला उपदेश आणि स्वतःसाठी वेगळे नियम का?” अशा आशयाचे फलकही दाखवण्यात आले. तसेच मोठ्या उद्योगपतींवरूनही त्यांनी सरकारला सवाल उपस्थित केले.

दरम्यान, पंतप्रधानांच्या आवाहनावरून देशभरात विविध प्रतिक्रिया उमटत असून, इंधन बचत आणि आर्थिक शिस्तीच्या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होताना दिसत आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts