• Home
  • राजकारण
  • मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय?
ताज्या बातम्या

मोठी राजकीय हालचाल! सुनील तटकरे यांची शरद पवारांना सिल्व्हर ओकवर भेट; नेमकं कारण काय?

sunil tatkari

Sunil Tatkare Meets Sharad Pawar at Silver Oak Residence: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढल्या आहेत. अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरी (Sunil Tatkare) यांनी शरद पवार यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले असून यामागचे नेमके कारण काय आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एका म्हत्वाची बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार गटातील जेष्ठ नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची त्यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी भेट घेतली.

हेही वाचा: मोदींच्या आवाहनावर राजकीय भडका! जितेंद्र आव्हाडांचा घोड्यावर बसून चंद्रकांत पाटीलांवर हल्लाबोल

या भेटीनंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा

गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये विलीनीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, मात्र त्या आता मागे पडल्याचे चित्र आहे. अशा पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या भेटीमागे शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस हा एक मुद्दा असल्याचे सांगितले जात आहे. अलीकडेच त्यांच्या प्रकृतीबाबत काही वेळा चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे तटकरे यांनी सदिच्छा भेट घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, अजित पवार गटाच्या संघटनात्मक बदलांच्या चर्चा आणि केंद्रीय पातळीवरील घडामोडी सुरू असतानाच ही भेट झाल्याने राजकीय अर्थ काढले जात आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी या भेटीबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts