Zodiac Horoscope May 20: उद्या २० मे २०२६, बुधवारचा दिवस अनेक राशींसाठी लाभदायक ठरणार आहे. ग्रह- नक्षत्रांच्या अनुकूल स्थितीमुळे काहींना आर्थिक फायदा, तर काहींना करिअर आणि वैयक्तिक आयुष्यात यश मिळण्याचे संकेत आहेत. जाणून घ्या मेष ते मीन राशींचे आजचे संपूर्ण भविष्य.
बुधवार, २० मे २०२६ हा दिवस अनेक राशींसाठी सकारात्मक घडामोडी घेऊन येणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सकाळी ११:१० पर्यंत चतुर्थी तिथी राहील आणि त्यानंतर पंचमी तिथी सुरू होईल. सकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत आर्द्रा नक्षत्राच्या प्रभाव राहील, त्यानंतर पुनर्वसू नक्षत्र सुरू होणार आहे. ग्रहस्थितीमुळे दुपारी २ वाजून १० मिनिटांपर्यंत शूल योग तयार होत असून काही राशींना आर्थिक आणि करिअरच्या बाबतीत विशेष लाभ मिळू शकतो.
हेही वाचा: NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय? आता 21 मे रोजी होणार महत्त्वाची बैठक
मेष राशी
आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नवीन संधी मिळतील आणि त्याचा योग्य फायदा घेऊ शकाल. नोकरीत प्रगतीची शक्यता. कायदा क्षेत्रातील लोकांसाठी दिवस लाभदायक असणार आहे. तसेच घरातील वातावरण आनंदी राहील.
शुभ रंग: लाल | शुभ अंक: 9
वृषभ राशी
पूर्वीच्या मेहनतीचे फळ मिळण्याची वेळ आली आहे. नवीन योजना फायदेशीर ठरतील. तसेच जोडीदारासोबत संवाद वाढण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. शारीरिक स्थितीत सुधारणा होईल.
शुभ रंग: पांढरा | शुभ अंक: 2
मिथुन राशी
भावनिकदृष्ट्या थोडा चढउताराचा दिवस राहू शकतो. ऑफिसमधील काही कामात विलंब होऊ शकतो, पण सहकार्य मिळेल. घर किंवा जमीन खरेदीचा विचार कराल. आणि जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.
शुभ रंग: हिरवा | शुभ अंक: 5
कर्क राशी
भाग्याची साथ मिळाल्यामुळे महत्त्वाच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ नाही. जुन्या कामांमध्ये प्रगती होईल.
कुटुंब: वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल. तुमचं आरोग्य उत्तम राहील.
शुभ रंग: पांढरट | शुभ अंक: 7
सिंह राशी
महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळतील. अडथळे दूर करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळेल.
प्रेम: नातेसंबंध अधिक मजबूत होतील.
शुभ रंग: सोनेरी | शुभ अंक: 1
कन्या राशी
आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होतील. नवीन कल्पना भविष्यात फायदेशीर ठरतील. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. तुमच्या तब्येतीत सुधारणा जाणवेल.
शुभ रंग: गडद हिरवा | शुभ अंक: 6
तूळ राशी
समजूतदारपणे घेतलेले निर्णय यश देतील. नवीन जबाबदाऱ्या स्वीकारल्यास लाभ होईल. गुरुजनांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. घरातील वातावरण समाधानकारक राहील.
शुभ रंग: फिकट निळा | शुभ अंक: 8
वृश्चिक राशी
अचानक मिळालेल्या धनलाभामुळे आर्थिक स्थिती सुधारेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल. आणि इतरांच्या बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका.
शुभ रंग: मरून | शुभ अंक: 3
धनु राशी
व्यवसायात चांगला नफा मिळण्याचे संकेत आहेत. वेब डिझाइन आणि मेडिकल क्षेत्रासाठी दिवस चांगला.
प्रेम: गैरसमज टाळा. ऑनलाइन व्यवहार करताना काळजी घ्या.
शुभ रंग: पिवळा | शुभ अंक: 4
मकर राशी
दिवसभर व्यस्तता राहील, पण कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. आर्थिकदृष्ट्या मजबूत वाटेल. मित्रांच्या मदतीने अडचणी दूर होतील. प्रकृती उत्तम राहील.
शुभ रंग: काळा | शुभ अंक: 10
कुंभ राशी
आजचा दिवस लाभदायक आणि सकारात्मक राहील. व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. वैवाहिक जीवन आनंदी राहील.
शुभ रंग: निळा | शुभ अंक: 11
मीन राशी
सकारात्मक विचार आणि नियोजनामुळे चांगले परिणाम मिळतील. तांत्रिक क्षेत्रातील तरुणांना नोकरीच्या संधी मिळू शकतात. नात्यात समजूतदारपणा वाढेल.
करिअरमध्ये नवीन पर्याय शोधा.
शुभ रंग: केशरी | शुभ अंक: 12












