शैक्षणिक बातम्या

NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय? आता 21 मे रोजी होणार महत्त्वाची बैठक

NEET

NEET Paper Leak: देशातील राष्ट्रीय प्रवेश परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होत असताना, २१ मे रोजी संसदीय स्थायी समिती नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) च्या कामकाजाचा सखोल आढावा घेणार आहे. विशेषतः नीट- यूजी परीक्षेची संबंधित पेपर फुटी आणि कथित गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. शिक्षण मंत्रालय आणि NTA अधिकाऱ्यांना या बैठकीसाठी हजार राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

NEET UG प्रकरणामुळे वाढली गंभीरता

नीट- यूजी परीक्षेनंतर पेपर लीक आणि गैरव्यवहाराच्या आरोपांनी देशभरात संतापाची लाट उसळली. यंदा सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज केला होता. मात्र विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित या गंभीर मुद्द्यामुळे केंद्र सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला आहे.

हेही वाचा: “अमेरिका आज इराणवर हल्ला करणार…”, डोनाल्ड ट्रम्प यांचं धक्कादायक वक्तव्य, तणाव आणखी वाढणार?

संसदीय समिती घेणार अधिकाऱ्यांचा जाब

काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत उच्च शिक्षण विभागाचे सचिव विनीत जोशी आणि NTA चे प्रमुख प्रदीप कुमार जोशी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित आहे. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कोणती पावले उचलली गेली, याबाबत समिती सविस्तर माहिती मागवणार आहेत.

पुनर्परीक्षा

NTA ने दिलेल्या माहितीनुसार, परीक्षेतील कथित गडबडीबाबतची माहिती परीक्षा झाल्यानंतर काही दिवसांनी समोर आली. त्यानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 21 जून रोजी NEET-UG ची पुनर्परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

AI आणि रोजगारक्षमता यावरही भर

या बैठकीत फक्त परीक्षा व्यवस्थेपुरतीच चर्चा मर्यादित राहणार नाही. शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वाढता वापर, तसेच विद्यार्थ्यांच्या रोजगारक्षमतेत वाढ करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवरही चर्चा होणार आहे. एंथ्रोपिक इंडिया, इन्फोसिस, प्रथम आणि IIT कानपूर यांसारख्या संस्थांचे प्रतिनिधी या चर्चेत सहभागी होण्याची शक्यता आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts