Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • यंदाच्या हंगामात राजस्थानचा पहिला पराभव; दोन नवख्या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर हैदराबाद विजयी
क्रीडा

यंदाच्या हंगामात राजस्थानचा पहिला पराभव; दोन नवख्या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर हैदराबाद विजयी

यंदाच्या हंगामात राजस्थानचा पहिला पराभव; दोन नवख्या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर हैदराबाद विजयी

हैदराबाद SRH Beat RR : आयपीएल 2026 च्या 21व्या सामन्यात (IPL 2026), राजस्थान रॉयल्सला सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. सामन्यात राजस्थान रॉयल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, इशान किशनच्या धडाकेबाज खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादनं 200 हून अधिक धावा केल्या. एसआरएचनं 20 षटकांत 5 गडी गमावून 216 धावा केल्या. प्रत्युत्तरात, राजस्थानचा संघ 19 षटकांत 159 धावांवर सर्वबाद झाला (srh beat rr), त्यामुळं हैदराबादनं 57 धावांनी विजय मिळवला. या हंगामातील राजस्थानचा हा पहिला पराभव आहे. या पराभवानंतरही, राजस्थान 8 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर कायम आहे.

हेही वाचा : नागपूरच्या प्रफुलची IPL च्या पहिल्याच सामन्यात कमाल; पहिल्याच षटकात 3

इशान किशनची दमदार खेळी :

प्रथम फलंदाजी करताना हैदराबादकडून इशान किशननं 44 चेंडूंमध्ये 91 धावा करत संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत 8 चौकार आणि 6 षटकार मारले. हेनरिक क्लासेननंही 40 धावांचं योगदान दिलं. गोलंदाजीत जोफ्रा आर्चरनं राजस्थानसाठी 2 बळी घेतले. संदीप शर्मा, तुषार पांडे आणि रियान पराग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

राजस्थाननं पहिल्याच षटकात गमावल्या 3 विकेट :

सनरायझर्स हैदराबादच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना, राजस्थान रॉयल्सच्या डावाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली. एसआरएचचा 24 वर्षीय गोलंदाज प्रफुल्ल हिंगेनं (Praful Hinge) डावाच्या पहिल्याच षटकात तीन बळी घेत खळबळ उडवून दिली. आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात, हिंगेनं वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल आणि लुआन-ड्रे प्रिटोरियस यांना आपल्या पहिल्याच षटकात बाद करुन राजस्थान रॉयल्सच्या गोटात घबराट पसरवली. धावसंख्या 9 धावांवर असताना राजस्थानचा निम्मा संघ तंबूत परतला होता. त्यानंतर डेनोवन फरेरिया आणि रवींद्र जडेजा यांनी डाव सावरला आणि संघाला 100 धावांच्या पुढं नेलं. यानंतर, राजस्थानची फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि 19 षटकांत 159 धावांवर त्यांचा संघ गारद झाला.

आयपीएलच्या पहिल्याच षटकात तीन बळी घेणारा पहिला खेळाडू :

आयपीएलची सुरुवात 2008 मध्ये झाली. डावाच्या पहिल्याच षटकात तीन बळी पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत गोलंदाजांनी 32 वेळा डावाच्या पहिल्याच षटकात दोन बळी घेतले आहेत. यापूर्वी भुवनेश्वर कुमारनं हा पराक्रम केला होता. 2024 मध्ये याच मैदानावर भुवीनं हैदराबादकडून खेळताना जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांना बाद केलं होतं.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts