Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • क्रीडा
  • IPL स्ट्रीमिंग महागात पडतंय? एक मॅच पाहण्यासाठी किती डेटा लागतो जाणून घ्या
क्रीडा

IPL स्ट्रीमिंग महागात पडतंय? एक मॅच पाहण्यासाठी किती डेटा लागतो जाणून घ्या

IPL Streaming Data Usage: यंदा आयपीएल २८ मार्च २०२६ पासून सुरू झाले असून लाखो लोक रोज ऑनलाईन मॅच पाहत असतात. त्यामुळे स्ट्रीमिंग पाहणे महागात पडते. चला तर जाणून घेऊयात SD ते 4K पर्यंत किती डेटा लागतो.

IPL 2026 बद्दलचाहत्यांमध्ये यंदाही मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. मागील हंगामाला लाखो प्रेक्षकांनी सामने ऑनलाईन पाहिले होते. पण लाईव्ह मॅच दरम्यान सर्वात जास्त दुर्लक्षित गोष्टी म्हणजे मोबाईल इंटरनेटचा वापर.

अनेक युजर्सना वाटतं की एका सामान्यात थोडासा डेटा खर्च होतो, पण प्रत्यक्षात स्ट्रीमिंग क्वालिटीच्या आधारावर एका IPL सामन्यासाठी अंदाजे २ GB ते २५ GB पर्यंत डेटा वापरला जाऊ शकतो. त्यामुळे मर्यादित डेटा प्लॅन लवकर संपण्याची शक्यता असते.

हेही वाचा: पुणे शहरात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; कोणते निर्बंध असणार? वाचा A टू Z संपूर्ण माहिती

SD, HD आणि Full HD मध्ये डेटा वापर किती?

मोबाईलवर IPL सामने पाहताना बहुतांश अॅप्स आपोआप 480p किंवा 720p क्वालिटी निवडतात. या क्वालिटीमध्ये प्रति तास सुमारे 0.5GB ते 2GB डेटा खर्च होऊ शकतो.

IPL सामना साधारण 3.5 ते 4 तास चालतो. त्यामुळे SD किंवा सामान्य HD क्वालिटीमध्ये पूर्ण सामना पाहण्यासाठी सुमारे 2GB ते 8GB डेटा वापरला जाऊ शकतो.

Full HD (1080p) मध्ये मात्र डेटा वापर खूप वाढतो. या क्वालिटीमध्ये एका सामन्यासाठी साधारण 10GB ते 12GB डेटा खर्च होऊ शकतो. तर 4K स्ट्रीमिंगमध्ये हा वापर 20GB ते 25GB पर्यंत जाऊ शकतो.

टेलिकॉम कंपन्यांचे क्रिकेट स्पेशल डेटा पॅक

IPL काळात वाढलेल्या डेटा वापरामुळे काही टेलिकॉम कंपन्यांनी खास क्रिकेट डेटा पॅक उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये अतिरिक्त 5GB ते 15GB डेटा दिला जातो.

तथापि, Full HD किंवा 4K स्ट्रीमिंगमध्ये हा डेटा फारसा टिकत नाही आणि काही सामन्यांमध्येच संपून जातो.

IPL पाहताना डेटा कसा वाचवावा?

डेटा वाचवण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे स्ट्रीमिंग अॅपमधील व्हिडिओ क्वालिटी सेटिंग बदलणे. Auto किंवा Full HD ऐवजी Standard किंवा Medium क्वालिटी निवडल्यास डेटा मोठ्या प्रमाणात कमी होते.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts