Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे शहरात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; कोणते निर्बंध असणार? वाचा A टू Z संपूर्ण माहिती
Pune

पुणे शहरात उद्यापासून १४ दिवस जमावबंदी लागू; कोणते निर्बंध असणार? वाचा A टू Z संपूर्ण माहिती

Pune Police Imposes 14-Day Curfew Order: नुकतंच विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणुकीचे बिगुल वाजले असून राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. या कारणास्तव पुणे पोलीस आयुक्तालयाकडून 26 मे 2026 पासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नुकतंच विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यभरात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. यासोबतच पुण्यात राजकीय वाद किंवा अन्य गोष्टींमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. या कारणास्तव पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयाकडून जमावबंदी आदेश लागू केले आहेत.

हेही वाचा: CUET-UG 2026 परीक्षा पुढे ढकलली; नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१), (२) आणि (३) अंतर्गत 14 दिवसांसाठी जमावबंदीचा आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश 26 मे 2026 ते 8 जून 2026 या कालावधीत लागू राहणार असून या काळात सभा, मोर्चे आणि आंदोलनांना पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

नागरिकांवर कोणते निर्बंध लागू असतील?

या कालावधीत सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या कोणत्याही कृतींवर बंदी असले. यामध्ये शस्त्र बाळगणे, दगड किंवा स्फोटक पदार्थ जवळ ठेवणे तसेच आक्षेपार्ह घोषणा किंवा भडकाऊ कृती करणे यांचा समावेश आहे.

मोर्चे, सभा, रॅली किंवा कोणत्याही प्रकारच्या सार्वजनिक आंदोलनांना परवानगी दिली जाणार नाही. तसेच गर्दी जमवून शांततेला बाधा आणणाऱ्या कृतींवर कठोर कारवाई केली जाईल.

काय करता येणार नाही?

– स्फोटक किंवा ज्वलनशील पदार्थ बाळगणे
– शस्त्रे, काठ्या किंवा इतर हानिकारक वस्तू जवळ ठेवणे
– दगडफेक किंवा अशा वस्तूंचा संग्रह करणे
– आक्षेपार्ह फलक, चिन्हे किंवा प्रतीकांचा वापर
– भडकाऊ घोषणा, गाणी किंवा भाषण करणे
– सार्वजनिक शांतता बिघडवणाऱ्या कृती करणे

नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तींवर कारवाई केली जाईल आणि अशा वस्तू जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना असेल.

निर्णयामागचे कारण

शहरात अलीकडेच नवले पुल परिसरात रिक्षाचालकांवर हल्ल्याची घटना घडली होती. तसेच बालाजीनगर परिसरात गोळीबाराची घटना घडून एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. आंदेकर-कोमकर टोळीयुद्ध आणि जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर या घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.

या पार्श्वभूमीवर शहरात विविध संघटना आणि गटांकडून आंदोलनांची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हा प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे.

पुणे पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts