• Home
  • क्रीडा
  • आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित-विराटचा दबदबा… दोघांनी काबिज केले पहिले दोन स्थान
क्रीडा

आयसीसी वनडे क्रमवारीत रोहित-विराटचा दबदबा… दोघांनी काबिज केले पहिले दोन स्थान

Rohit Sharma and Virat Kohli celebrating on the cricket field after securing top two positions in ICC ODI rankings

Rohit Virat ICC ODI Rankings : माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीनं आयसीसी वनडे क्रमवारीत लक्षणीय झेप घेतली आहे. कोहली अद्याप पहिल्या क्रमांकावर पोहोचलेला नाही, परंतु त्यानं रोहित शर्मासमोर निश्चितच एक मोठं आव्हान उभं केलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या दोन वनडे सामन्यांमध्ये विराट कोहलीची प्रभावी फलंदाजी कामगिरी यशस्वी ठरत असल्याचं दिसून येत आहे.

रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर कायम :

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वनडे मालिका संपली आहे. त्यानंतर, आयसीसीनं नवीन वनडे क्रमवारी जाहीर केली आहे. नवीन क्रमवारीत माजी भारतीय कर्णधार रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर कायम आहे. त्याचं रेटिंग सध्या 782 आहे. विराट कोहली आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यावेळी कोहलीनं दोन स्थानांची झेप घेतली आहे, त्याचं रेटिंग 773 वर पोहोचला आहे. याचा अर्थ रोहित आणि कोहलीच्या रेटिंगमध्ये फारसा फरक नाही. जर रोहितला त्याचं पहिले क्रमांक टिकवायचं असेल तर त्याला पुढील सामन्यात मोठी खेळी खेळावी लागेल.

 

डॅरिल मिशेल आणि इब्राहिम झद्रानची घसरण :

यावेळी विराट कोहलीनं दोन स्थानांची वाढ केली आहे, तर न्यूझीलंडच्या डॅरिल मिशेल आणि अफगाणिस्तानचा इब्राहिम झद्रान यांनी प्रत्येकी एक स्थान गमावलं आहे. डॅरिल मिशेल आता 766 रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर इब्राहिम झद्रानचं रेटिंग 764 आहे, ज्यामुळं तो चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा शुभमन गिल पाचव्या क्रमांकावर कायम आहे आणि पाकिस्तानचा बाबर आझम सहाव्या क्रमांकावर आहे. मनोरंजक म्हणजे, भारताचा श्रेयस अय्यर आता एक स्थान गमावून दहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. श्रीलंकेचा चरिथ असलंका एका स्थानानं पुढं जाऊन नवव्या क्रमांकावर पोहोचला आहे.

हे ही वाचा : पहिल्या टी-20 सामन्यात टीम इंडियाचा मोठा विजय; आफ्रिकेचा 74 धावांत खुर्दा

टीम इंडिया आता जानेवारीमध्ये खेळणार वनडे :

भारतीय संघ या वर्षी एकही वनडे सामना खेळणार नाही, त्यामुळं भारतीय खेळाडूंच्या रेटिंगवर कोणताही परिणाम होणार नाही. जानेवारीमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळली जाईल, ज्यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली पुन्हा एकदा खेळताना दिसतील. त्यानंतर, क्रमवारीत काही बदल होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts