Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • NEET प्रकरणात डॉक्टरचा झाला पर्दाफाश; मोटेगावकरांशी थेट संबंध, CBIच्या तपासात मोठा खुलासा
Top News

NEET प्रकरणात डॉक्टरचा झाला पर्दाफाश; मोटेगावकरांशी थेट संबंध, CBIच्या तपासात मोठा खुलासा

NEET Paper Leak Case | नीट पेपरफुटी प्रकरणाने (NEET Paper Leak Case) सर्वांनाच हादरवून सोडले आहे. कारण या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. आत्तापर्यंत या प्रकरणात अनेक बड्या व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रात सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली नीट-जेईई कोचिंगच्या संस्थेचे मालक शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यानंतर आता या प्रकरणी सीबीआयने (CBI) एका डॉक्टरला ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा – ठाण्यात आगीचे रौद्ररूप! पहाटेच्या वेळी भाजी मार्केटला लागली भीषण आग, 2 जणांचा होरपळून मृत्यू

CBI तपासात नेमका काय झाला खुलासा?

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास सध्या सीबीआयकडून केला जात आहे. तर सीबीआयच्या तपासात आता मोठी माहिती समोर आली आहे. सीबीआयने लातूरच्या बालरोगतज्ज्ञ डॉक्टर मनोज शिरूरे याला अटक केली आहे. मनोज शिरूरेचे मोटेगावकरांसोबत कनेक्शन सापडले असून धक्कादायक माहिती सीबीआयच्या हाती लागल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. मनोज शिरूरे याने स्वत:च्या मुलासाठी मोटेगावकरांकडून पेपर खरेदी केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत चौकशीसाठी लातूरहून पुण्याला आणलं होतं. त्यानंतर त्याची कसून चौकशी सीबीआयने केली आणि त्याला बेड्या ठोकण्यात आल्या.

तपासादरम्यान संशयास्पद माहिती मिळाल्यानंतर सीबीआयने पुण्यात काही संशयित विद्यार्थ्यांच्या घरांवर छापा टाकला होता. यादरम्यान काल रात्री लातूरमध्येही सीबीआयने ही कारवाई केली. त्यावेळी मनोज शिरूरेच्या घरीही सीबीआयने धाड टाकत त्याला अटक केली. शिरूरे हा मोटेगावकर आणि पी. व्ही. कुलकर्णी यांच्या संपर्कात असल्याची माहिती सीबीआयला मिळाली आहे.

दरम्यान, सध्या सीबीआय या प्रकरणाचा अधित तपास करत आहेत. शिरूरेने नेमका पेपर कोणाकडून विकत घेतला आणि त्याने तो पेपर आणखी कोणाला दिला होता का? याचा तपास केला जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts