Shivraj Motegaonkar Viral Video | सध्या नीट परीक्षेच्या पेपरफुटी (NEET Paper Leak Case) प्रकरणाने संपूर्ण देशाला हादरवून सोडले आहे. या प्रकरणात अनेक बड्या लोकांची नावे समोर आली असून त्या लोकांना केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) अटक केली आहे. यामध्ये महाराष्ट्रात जेईई-नीट साठी प्रसिद्ध असलेली RCC संस्थेचे मालक शिवराज मोटेगावर (Shivraj Motegaonkar) यांना सीबीआयने बेड्या ठोकल्या आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरांचा सहभाग आढळल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
शिवराज मोटेगावकरांचं विद्यार्थ्यांसोबत विचित्र कृत्य, व्हिडीओ व्हायरल
सीबीआयने शिवराज मोटेगावकरांना अटक केल्यानंतर त्यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. आताही त्यांचा एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे या संपूर्ण प्रकरणाला एक नवीन वळण मिळाले असून सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये आरोपी शिवराज मोटेगावकर एक विचित्र कृत्य करताना दिसत आहेत. ते एका ताब्यांत पाणी घेऊन ते पाणी आरसीसी इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांवर शिंपडताना दिसत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मोटेगावकर व्हिडीओमध्ये असा दावाही करत आहे की हे पाणी शिंपडल्याने विद्यार्थ्यांचे परीक्षेतील गुण वाढतील. सध्या मोटेगावकरांचा हा भुवया उंचावणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
मोटेगावकरचे चाळे! विद्यार्थ्यांवर पाणी शिंपडून AIMS ची हमी देणारे क्लासचालक! pic.twitter.com/CuWmfvYAnN
— Rahul Kulkarni (@RahulAsks) May 24, 2026
शिवराज मोटेगावकरांच्या अटकेनंतर त्यांची कोचिंग संस्था आरसीसी इन्स्टिट्यूट सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. सीबीआयच्या तपासात उघड झालं आहे की, शिवराज मोटेगावकर पूर्णपणे व्यावसायिक पद्धतीने पेपरफुटीचा व्यवसाय चालवत होते. त्यांनी अनेक लोकांकडून लाखो रूपये घेत विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वीच प्रश्न पुरवले होते. तसेच हे देखील उघड झाले आहे की, आरसीसी इन्स्टिट्यूटमधील 21 विद्यार्थ्यांची 2025 च्या नीट परीक्षेसाठी निवड झाली होती. यापैकी 19 जणांना एम्समध्ये प्रवेश मिळाला होता. त्यामुळे आता सीबीआयकडून या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी करण्यात येत आहे.
दरम्यान, सीबीआय नंतर अंमलबारी संचालनालय (ईडी) देखील मोटेगावकर यांच्या विरोधात मनी लाँड्रिंगचा तपास सुरू करण्याच्या तयारीत आहे. सीबीआयने आपल्या तपासादरम्यान अनेक बँक खात्यांचा आणि व्यवहारांचा तपशील मिळवला आहे. सीबीआयच्या तपासाच्या आधारे ईडी देखील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.












