NEET Paper Leak Case | नीट पेपर फुटीमुळे (NEET Paper Leak Case) संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनेक आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सध्या नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास अन्वेषण ब्युरो (CBI) करत आहेत. तर आता शिवराज मोटेगावकर (Shivraj Motegaonkar) यांच्या अटकेनंतर सीबीआयच्या निशाण्याखाली त्यांची कोचिंग संस्था आरसीसी (RCC) आली आहे.
हेही वाचा – दिल्ली हादरली! कॉलेज परिसरात गोळीबार, एकाचा मृत्यू, नेमकं घडलं काय?
मोटेगावकरांच्या कोचिंग संस्थेची CBI कडून होणार चौकशी
सध्या सीबीआयकडून शिवराज मोटेगावकरांच्या कोचिंग संस्थेची चौकशी केली जात आहे. कारण शिवराज मोटेगावकरांच्या आरसीसी इन्स्टिट्यूटमधील 21 विद्यार्थ्यांची 2025 च्या नीट परीक्षेसाठी निवड झाली होती. तर या 21 विद्यार्थ्यांपैकी 19 विद्यार्थ्यांना देशातील प्रतिष्ठित एम्समध्ये प्रवेश मिळाला असून दोन विद्यार्थ्यांना मुंबईतील केईएम हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळाला आहे. त्यामुळे सीबीआयचा संशय वाढला असून त्यांच्या संस्थेची आणि त्या 19 विद्यार्थांची चौकशी केली जाणार आहे.
सीबीआय आरसीसी संस्थेच्या जुन्या नोंदींची तपासणी करणार आहे. मोटेगावकरांना 2025 पूर्वी नीटच्या अचूक प्रश्नपत्रिका मिळाल्या होत्या की नाही, याचा शोध सीबीआय घेणार आहे. सोबतच मागील चार ते पाच वर्षांत आरसीसीमधून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी, गुण आणि रँक यांची देखील तपासणी केली जाणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, आरसीसी संस्थेने त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांचे गुण, रँक आणि प्रतिष्ठित नीट स्कोअर यांचा वापर त्यांच्या संस्थेच्या मार्केटिंगसाठी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मिळालेले हे यश खरंच कठोर मेहनतीमुळे मिळाले होते की यात दुसरा काही डाव होता, याचा सीबीआय तपास करणार आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी नवीन खुलासे होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, आरसीसी इन्स्टिट्यूटचे संचालक शिवराज मोटेगावकर यांना सीबीआयने अटक केली आहे. मोटेगावकरांची महाराष्ट्रात सर्वात मोठी नीट-जेईई कोचिंग संस्था प्रसिद्ध आहे. तसेच मोटेगावकर हे लातूरचे प्रसिद्ध रसायनशास्त्राचे शिक्षक आहेत. पण आता नीट पेपरफुटी प्रकरणात त्यांचा सहभाग आढळल्याने संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे.












