Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • 15 राज्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच हवामानात मोठा बदल, IMD चा मोठा इशारा
Top News

15 राज्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता; मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच हवामानात मोठा बदल, IMD चा मोठा इशारा

IMD Weather Alert: १ जूननंतर हवामानात बदल होण्याची शक्यता असून ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

देशभरातील हवामानात मोठे बदल दिसून येत असून भारतीय हवामान विभागाने अनेक राज्यांसाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे. उत्तर भारतापासून दक्षिणेकडील किनारपट्टीपर्यंत विविध भागांमध्ये मुसळधार पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही ठिकाणी ताशी ९० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह सुमारे १५ राज्यांमध्ये पुढील काही दिवसांत जोरदार पावसासह वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. कहाणी भागांमध्ये गारपीटीचीही शक्यता असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा: पुणे विषारी दारू प्रकरणात मोठी कारवाई; पिंपरी-चिंचवडचे ६, पुणे शहरातील ३ पोलिस अधिकारी निलंबित

उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये आधीच पावसाने हजेरी लावली असून काही ठिकाणी वादळी हवामानाचा प्रभाव जाणवत आहे. दरम्यान, तामिळनाडूच्या उत्तर किनारपट्टीजवळ वातावरण चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाल्याने हवामानातील बदल अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोणत्या शहरांमध्ये अलर्ट जारी

महाराष्ट्रातही उष्णतेचा जोर काहीसा कमी होण्याची चिन्हे आहेत. विदर्भासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धुळे, नंदुरबार, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वाशिम, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून विदर्भात तीव्र उष्णतेचा सामना करावा लागत होता. अनेक भागांमध्ये तापमान 45 ते 47 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र आता पावसाच्या शक्यतेमुळे तापमानात घट होऊन ते 40 ते 42 अंशांदरम्यान राहण्याचा अंदाज आहे. त्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज आणि उद्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस, मेघगर्जना आणि जोरदार वारे अनुभवायला मिळू शकतात. काही ठिकाणी गारपिटीचाही धोका कायम आहे. मॉन्सूनच्या आगमनापूर्वीच बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यांमध्ये सतर्कतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts