• Home
  • महाराष्ट्र
  • पाकिस्तानच्या शहजाद भट्टीला महाराष्ट्र ATS ने दिला मोठा झटका; रेड टाकत केला पर्दाफाश
Top News

पाकिस्तानच्या शहजाद भट्टीला महाराष्ट्र ATS ने दिला मोठा झटका; रेड टाकत केला पर्दाफाश

ats

Maharashtra ATS Raid | महाराष्ट्र एटीएसने (ATS) पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टी (Pakistani Gangster Shahzad Bhatti) विरोधात मोठी कारवाई केली आहे. गुंड शहजाद भट्टी आणि डोग्रा टोळीशी संबंधित असलेल्या आणि त्यांच्या कनेक्शनमध्ये असलेल्या लोकांविरूद्ध एटीएसने कडक कारवाई केली आहे. एटीएसने एकाचवेळी अनेक ठिकाणी छापे टाकत या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टी हादरली; नेमकं घडलं काय?

एटीएसने महाराष्ट्रातील 9 ठिकाणी केली छापेमारी

मिळालेल्या माहितीनुसार, आज (13 मे) सकाळी 8 वाजल्यापासून महाराष्ट्रभर एटीएसने छापे टाकण्यास सुरूवात केली आहे. एटीएसने महाराष्ट्रातील पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, नालासोपारा, मीरा रोड, मुंबई, अकोला आणि जळगाव येथे छापेमारी करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानी गुंड शहजाद भट्टीसोबत आणि डोग्रा टोळीसोबत जे लोक सोशल मीडियावरून जोडलेले आहेत किंवा त्यांना फॉलो करत आहेत त्या सर्व लोकांची किंवा स्थानिक टोळ्यांची एटीएस चौकशी करणार आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील तरूणांना सीमेपलीकडील हे गुंड सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या टोळ्यांमध्ये भरती करण्यासाठी चिथावणी देत ​​असल्याची माहिती तपास यंत्रणांना बऱ्याच काळापासून मिळत होती. हे गट स्थानिक मुलांना आलिशान जीवनशैलीचे आमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढत असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. यापार्श्वभूमीवर एटीएसने मोठी कारवाई केली आहे.

एटीएसची ही मोहीम प्रामुख्याने या टोळ्यांच्या स्लीपर सेल आणि स्थानिक कार्यकर्त्यांना ओळखण्याच्या उद्देशाने राबवली जात आहे, जेणेकरून महाराष्ट्रातील शस्त्रांची तस्करी किंवा कोणताही मोठा कट प्रत्यक्षात येण्यापूर्वीच रोखता येईल.

एटीएसने केलेल्या या छापेमारीत संशयितांच्या लपण्याच्या ठिकाणांहून लॅपटॉप, मोबाईल फोन, पेन ड्राइव्ह आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली जात आहेत. तसेच आता पाकिस्तानमधून ‘हवाला’ मार्गांनी पैशांचा प्रवाह होत आहे का, हे तपासण्यासाठी तपास अधिकारी संशयितांच्या बँक खात्यांची आणि आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts