SSC Recruitment 2026: SSC (कर्मचारी निवड अयोग) मार्फत विविध पदांसाठी मेगा भरती जाहीर करण्यात आली असून, सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.
सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. कर्मचारी निवड आयोग (SSC) ने सिलेक्शन पोस्ट फेज- १४ अंतर्गत ३००३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीद्वारे केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाणार आहे.
हेही वाचा: तुमचा भीम जयंती AI फोटो बनवा प्रोफेशनल लूकमध्ये; वापरा ‘हे’ 5 फ्री Prompt
१० वी, १२ वी आणि पदवीधर उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी असून, आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार विविध पदांसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी ही संधी सोडू नये. अधिक माहितीसाठी तुम्ही https://ssc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊ शकता.
अर्जाची प्रक्रिया
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरू झाली आहे. उमेदवारांना ४ मे २०२६ पर्यंत अर्ज करता येईल, तर अर्ज शुल्क भरण्याची अंतिम तारीख ५ मे आहे. अर्ज भरताना काही चुका झाल्यास, ११ ते १३ मे दरम्यान दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. परीक्षेचे आयोजन जून महिन्यात होण्याची शक्यता आहे.
पात्रता
या भरतीमध्ये 10वी, 12वी आणि पदवीधर उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार संधी मिळणार आहे. उमेदवारांची वयोमर्यादा साधारणतः 18 ते 25 वर्षे आहे, मात्र काही पदांसाठी कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपर्यंत आहे.
नवीन परीक्षा पद्धती
यावेळी SSC ने परीक्षा पद्धतीत काही महत्त्वाचे बदल केले आहेत. परीक्षेत रीजनिंग, सामान्य ज्ञान, गणित आणि इंग्रजी या विषयांचा समावेश असेल. प्रत्येक विषयासाठी 15 मिनिटांचा स्वतंत्र वेळ दिला जाईल. एकूण 100 प्रश्न 200 गुणांसाठी असतील आणि संपूर्ण परीक्षा 60 मिनिटांत पूर्ण करावी लागेल.
निवड प्रक्रियेत सुधारणा
निवड प्रक्रिया अधिक स्पष्ट आणि पारदर्शक करण्यासाठी नवीन पद्धतींचा अवलंब करण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पसंतीनुसार पद निवडण्याची सुविधा देण्यात येत आहे, ज्यामुळे योग्य उमेदवारांना योग्य संधी मिळण्यास मदत होणार आहे.






