Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “विरोधी पक्षांची भूमिका कपटी…”, महिला आरक्षणावरून वाद पेटला; योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र
Top News

“विरोधी पक्षांची भूमिका कपटी…”, महिला आरक्षणावरून वाद पेटला; योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

yogi adityanath
91

CM Yogi Adityanath | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (CM Yogi Adityanath) यांनी महिला आरक्षणावरून (Women Reservation) विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला आहे. महिला आरक्षणावरील विरोधी पक्षांची भूमिका कपटी असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. लखनौ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर खोचक टीका केली.

हेही वाचा – टीएमसीला बंगालच्या मुलींनी आमदार-खासदार व्हावे असं वाटत नाही, कारण…, पंतप्रधान मोदींचे गंभीर आरोप

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विरोधी पक्षांवर हल्लाबोल

पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 मध्ये जेव्हा सत्तेवर आले तेव्हा त्यांनी स्पष्ट केलं होतं की देशात महिला, गरीब, तरुण आणि शेतकरी अशा चार जाती आहेत. जे लोक भारताला जातीयवादाच्या नावाखाली कमकुवत करण्याच्या उद्देशाने आपल्या कुटुंबासाठी देशाला लुटत आहेत, त्यांच्यासाठी हे एक आव्हान आणि इशारा दोन्ही आहे. त्यामुळेच, जेव्हा जेव्हा पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली पुरोगामी पावले उचलली गेली आहेत, तेव्हा काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी त्याला विरोध केला आहे, अशी टीका योगी आदित्यनाथ यांनी केली.

पुढे ते म्हणाले की, संसदेचे विशेष अधिवेशन 16, 17 आणि 18 तारखेला बोलावण्यात आले होते, परंतु विरोधी पक्षांच्या कुटिल मानसिकतेमुळे महिला आरक्षण विधेयक मंजूर होऊ शकले नाही. मतदारसंघात पुनर्रचनेबाबत संभ्रम पसरला. या पापात सामील असलेल्यांच्या विरोधात जनता आहे, असंही योगी आदित्यनाथ म्हणाले.

विरोधी पक्षांना आपल्या पापांचे प्रायश्चित्त करण्याची एक मोठी संधी मिळाली होती, पण त्यांनी ती वाया घालवली. राष्ट्रीय हितासाठी घेतलेल्या निर्णयाला विरोधी पक्षांनी विरोध केला. मतदारसंघ पुनर्रचनेमुळे कोणत्याही राज्यातील जागांची संख्या कमी होणार नाही, असे आश्वासन पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना दिले होते. या आश्वासनानंतरही विरोधी पक्षांचा संकुचितपणा उघड झाला.आम्ही पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नांना पाठिंबा देतो. समाजातील प्रत्येक घटकासाठी त्यांनी उचललेल्या पावलांमध्ये संपूर्ण उत्तर प्रदेश राज्य त्यांच्या पाठीशी उभे आहे. विरोधी पक्षांची कृती अक्षम्य आहे, त्यामुळे अर्धी लोकसंख्या त्यांना माफ करणार नाही, असंही योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts